PBKS vs DC: दिल्लीच्या संघात पृथ्वी शॉ परतला तर पंजबाकडून रबाडाला संधी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
PBKS vs DC, IPL 2023 : पंजाबचा कर्णधार शिखर धवन याने नाणेफेकीचा कौल जिंकलाय.
PBKS vs DC, IPL 2023 : पंजाबचा कर्णधार शिखर धवन याने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. धर्मशाला मैदानावर शिखर धवन याने प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. दिल्लीला प्रथम गोलंदाजी करायची होती, असे वॉर्नरने नाणेफेकीनंतर सांगितले.
दिल्लीच्या संघात दोन मोठे बदल झाले आहे. दिल्लीने पृथ्वी शॉ याला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली आहे. त्याशिवाय एनरिख नॉर्खियाही दिल्लीच्या संघात परतलाय. त्याशिवाय पंजाबच्या संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. पंजाबने अथर्व तायडे याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. तसेच सिकंदर रजा याच्याजागी कगिसो रबाडाला संधी दिली आहे.
दिल्लीची प्लेईंग 11 -
डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिल साल्ट, रायली रुसो, अक्षर पटेल, अमन खान, यश धुल, कुलदीप यादव, एनरिख नॉर्खिया, खलील अहमद
DA Warner*, PP Shaw, PD Salt†, RR Rossouw, AR Patel, Aman Hakim Khan, YV Dhull, Kuldeep Yadav, A Nortje, I Sharma, KK Ahmed
पंजाबची प्लेईंग --
शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), सॅम करन, एम शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, दीपक चाहर, कगिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंह
S Dhawan*, A Taide, LS Livingstone, JM Sharma†, SM Curran, M Shahrukh Khan, Harpreet Brar, RD Chahar, K Rabada, NT Ellis, Arshdeep Singh
दिल्लीचे इम्पॅक्ट प्लेअर -
मुकेश कुमार, अभिषेक पोरेल, रिपल पटेल, प्रविण दुबे, सर्फराज
Mukesh, Porel, Ripal, Dubey, Sarfaraz
पंजाबचे इम्पॅक्ट प्लेअर -
प्रभसिमरन, सिकंदर रजा, शॉर्ट, ऋषी धवन, राठी Prabhsimran, Raza, Short, R Dhawan, Rathee
कसा असेल खेळपट्टीचा अहवाल?
आज, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत धर्मशालामध्ये एकही सामना खेळला गेला नाही. बर्फाच्छादित टेकड्यांनी वेढलेल्या या सुंदर क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं तर, इथे फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी नक्कीच सोयीस्कर असेल. पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या सीझनमध्ये आतापर्यंत इथे एकही सामना झालेला नाही, त्यामुळे येथील खेळपट्टीवर खेळण्यासाठी दोन्ही संघांची कसोटी लागणार एवढं मात्र नक्की. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही संघांमधील स्पिनर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
पंजाबला प्ले ऑफमध्ये क्लॉलिफाय करण्याची संधी
पंजाब आपला 13वा साखळी सामना खेळणार आहे. 12 सामन्यांत 6 सामने जिंकल्यानंतर पंजाब 12 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. पंजाब आपले दोन्ही सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. मात्र, दोन्ही सामने जिंकूनही संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. तसेच, संघाचा नेट रनरेट (-0.268) देखील खूप खराब आहे.