LSG vs SRH : मार्करमच्या नेतृत्त्वात हैदराबादची लढत, डी कॉकमुळे लखनौची ताकद वाढणार; कशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग 11
IPL 2023, SRH vs LSG : आज आयपीएल 2023 मध्ये लखनौ आणि हैदराबाद यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. लखनौच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे.
Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier league) 2023 मधील 10 वा सामना लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमध्ये रणसंद्राम पाहायला मिळेल. लखनौ सुपर जायंट्स संघामध्ये क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) पुनरागमन करणार आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्कराम (Aiden Kyle Markram) संघात सामील होणार आहे. त्यामुळे हा सामना रोमांचक होणार आहे.
IPL 2023, SRH vs LSG : नवा कर्णधार एडन मार्करमच्या नेतृत्वात हैदराबाद
हैदराबाद संघासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे कारण अद्याप संघाला खातं उघडता आलेलं नाही. आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात हैदराबादचा पराभव झाला होता. हा त्यांचा दुसरा सामना असेल. नवा कर्णधार एडन मार्करमच्या पुनरागमनानंतर सनरायझर्स हैदराबाद आपलं खातं उघडण्याच्या तयारीत आहे. संघाचा मूळ कर्णधार मार्करमच्या अनुपस्थितीत, भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखालील सनरायझर्सला पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून 72 धावांनी पराभव पत्करावा लागला. आता नव्या कर्णधारामुळे संघाला बळकटी मिळणार का हे पाहावं लागणार आहे.
IPL 2023, LSG vs SRH : लखनौ संघाला क्विंटन डी कॉकची साथ
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डिकॉकही लखनौ संघात दाखल झाला आहे, मात्र त्याच्या पुनरागमनामुळे संघाच्या नियोजनावर चर्चा करावी लागणार आहे. आतापर्यंत दोन सामन्यांत सलामी देणाऱ्या काइल मेयर्सने आपली आक्रमक फलंदाजी दाखवत अर्धशतकं झळकावली आहेत. आता डिकॉक संघाता सामील झाल्यावर मेयर्स तिसऱ्या क्रमांकावर उतरण्याची शक्यता आहे.
IPL 2023, SRH vs LSG : केएल राहुलचा फॉर्म सुधारणार?
लखनौ संघासाठी दुसरी चिंतेची बाब म्हणजे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कर्णधार केएल राहुलचा फॉर्म. राहुलची खेळी सध्या चिंतेचा विषय आहे. यंदाच्या मोसमातील सलग दोन सामन्यांमध्ये केएल राहुलची निराशाजनक खेळी पाहायला मिळाली आहे. डीकॉकच्या आगमनानंतर ओपनिंगमध्ये राहुलला फायदा झाल्यास लखनौ संघासाठी हे फायदेशीर ठरेल. दुसरीकडे, गोलंदाजांमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई यांनी लखनौसाठी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे.
LSG vs SRH Playing 11 : दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल जाणून घ्या...
LSG Playing 11 : लखनौ संभाव्य प्लेईंग 11
लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, काइल मेयर्स, दीपक हुडा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, मार्क वुड, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई, आवेश खान
LSG Impact Players : लखनौ इम्पॅक्ट प्लेअर
कृष्णप्पा गौतम, प्रेरक मांकड, मनन वोहरा, करण शर्मा
SRH Playing 11 : हैदराबाद संभाव्य प्लेईंग 11
अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), आदिल रशीद, उमरान मलिक, टी नटराजन
SRH Impact Players : हैदराबाद इम्पॅक्ट प्लेअर
हॅरी ब्रुक्स, मार्को जानसन, फाजलहक फारुकी, हेनरिक क्लासेन
महत्त्वाच्या इतर बातम्या :
LSG vs SRH, Preview : हैदराबाद पहिला विजय मिळवणार? लखनौही विजयासाठी सज्ज; कुणाचं पारड जड?