LSG vs SRH, Preview : हैदराबाद पहिला विजय मिळवणार? लखनौही विजयासाठी सज्ज; कुणाचं पारड जड?
IPL 2023 Match 10 LSG vs SRH : लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात 7 एप्रिल रोजी आयपीएल 2023 (IPL 2023) मधील दहावा सामना रंगणार आहे.
Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 7 एप्रिल रोजी दहावा सामना लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात होणार आहे. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर (Ekana Stadium) शक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. यंदाच्या मोसमातील लखनौ संघाचा हा तिसरा सामना असेल तर हैदराबाद संघाचा दुसरा सामना असेल. दोन्ही संघ विजयाच्या आशेने मैदानावर उतरतील.
IPL 2023, LSG vs SRH Match 10 Preview : लखनौ विरुद्ध हैदराबाद
सनरायझर्स हैदराबादने या स्पर्धेत एक सामना खेळला असून त्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागले आहे. दुसरीकडे, दोन सामने खेळलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने एक सामना जिंकला तर दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला.
SRH vs LSG Head to Head : कुणाचं पारड जड?
लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलमध्ये याआधी एकच सामना झाला आहे. हा सामना लखनौने जिंकला होता. या सामन्यात लखनौनं 169 धावांचं लक्ष दिलं होतं. मात्र, हैदराबादला 157 धावाचं करता आल्या होत्या. या मोसमात लखनौने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना 50 धावांनी जिंकला. त्यानंतर दुसरा सामना चेन्नईविरुद्ध खेळला. या सामन्यात चेन्नईने लखनौचा पराभव करत 12 धावांनी सामना जिंकला. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादची संघाला अद्यापही खातं उघडता आलेलं नाही. हैदराबादचा राजस्थान रॉयल विरुद्ध पहिला सामन्या पराभव झाला. यामध्ये राजस्थानने हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला.
Quick KA-tch up ✨#OrangeFireIdhi #OrangeArmy #IPL2023 #LSGvSRH pic.twitter.com/ddAZYpnC7J
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 5, 2023
IPL 2023, SRH vs LSG : कधी आणि कुठे होणार सामना?
लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामना 7 एप्रिलरोजी लखनौ येथील एकाना स्टेडिअमवर (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार असून त्याआधी 7 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023, SRH vs LSG live : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :