IPL 2023, Kyle Mayers : पदार्पणाच्या सामन्यातच काइल मेअर्सची दमदार खेळी, वडिलांकडून गिरवले क्रिकेटचे धडे
LSG vs DC, IPL 2023 : लखनौच्या काइल मेअर्सने पदार्पणाच्या सामन्यात शानदार खेळी करत 73 धावा केल्या. त्याने वडिलांकडून क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं असून त्याचे वडीलही क्रिकेटपटू होते.
![IPL 2023, Kyle Mayers : पदार्पणाच्या सामन्यातच काइल मेअर्सची दमदार खेळी, वडिलांकडून गिरवले क्रिकेटचे धडे IPL 2023 kyle mayers was trained by his father shirely clarke hits fifty in ipl debut match for lucknow vs delhi capitals IPL 2023, Kyle Mayers : पदार्पणाच्या सामन्यातच काइल मेअर्सची दमदार खेळी, वडिलांकडून गिरवले क्रिकेटचे धडे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/02/2b0ba33d451995e7326b1b0a12805a3c1680427496803322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kyle Mayers Trained by Father Shirely : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या तिसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 50 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात लखनौ संघाकडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) पदार्पण करणाऱ्या काइल मेअर्सने (Kyle Mayers) सर्वांचं लक्ष वेधलं. पदार्पणाच्या सामन्यात लखनौ संघातील काइल मेअर्सने शानदार खेळी केली. लखनौ संघाकडून पदार्पणाच्या सामन्यातच त्याने अर्धशतक झळकावले. त्याचे वडीलही क्रिकेटपटू होते. काइलने त्याच्या वडिलांकडूनच क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं आहे.
IPL 2023, Kyle Mayers : वडीलांकडून घेतले क्रिकेटचे धडे
काइल मेअर्सचे वडील माजी क्रिकेटपटू आहेत. त्याचं नाव शिर्ले क्लार्क होतं. काइल मेअर्सचे वडील शिर्ले क्लार्क आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळू शकले नाहीत. मात्र, त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली. शिर्ले यांच्या मुलगा काइल मेअर्सला क्रिकेटचं धडे शिकवले. काइलने 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
Who is Kyle Mayers : कोण आहे काइल मेअर्स?
काइल रिको मेअर्स (Kyle Rico Mayers) हा वेस्ट इंडिजचा (West Indies Cricket Team) खेळाडू आहे. काइलचं वय 30 वर्ष आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटर शिर्ले क्लार्क (Shirley Clarke) हे मेअर्सचे वडील. काइल 2012 मध्ये वेस्ट इंडिजच्या अंडर 19 वर्ल्ड कप (ICC Under-19 Cricket World Cup) संघाचा भाग होता. मेअर्सने टी20 सामन्यातून कारकिर्दीला सुरुवात केली. 29 नोव्हेंबर 2020 मध्ये काइल मेअर्सने न्युझीलंड विरुद्ध पहिला टी20 सामना खेळला. या सामन्यात त्याने 14 चेंडूत 20 धावा केल्या होत्या.
LSG vs DC, Kyle Mayers : काइल मेअर्सची 73 धावांची दमदार खेळी
दिल्ली विरुद्धच्या सामन्यात काइल मेअर्सने 73 धावांची तुफान खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना काइल मेअर्सच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनौने 20 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 193 धावा केल्या. संथ सुरुवातीनंतर काइल मेअर्स याने आक्रमक रुप घेतले. कर्णधार माघारी परतल्यानंतरही काइल मेअर्स याने तुफानी फटकेबाजी केली. काइल मेअर्सच्या फटकेबाजीसमोर दिल्लीची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. दिपक हुड्डासोबत मेर्सने 80 धावांची भागिदारी केली. काइल मेअर्स याने अवघ्या 38 चेंडूत 73 धावांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान काइल मेअर्स याने सात गगनचुंबी षटकार लगावले. तर दोन खणखणीत चौकार मारले. काइल मेअर्स खेळत असताना लखनौ संघ आरामात 200 धावांचा पल्ला पार करेल असे वाटत होते. पण अक्षर पटेल याने काइल मेअर्स याचा अडथळा दूर केला. अक्षर पटेल याने काइल मेअर्स याला क्लीन बोल्ड केलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)