एक्स्प्लोर

RCB vs KKR, Match Highlights: फिरकीच्या जाळ्यात पुन्हा अडकला आरसीबीचा संघ, कोलकात्याचा 21 धावांनी विजय

IPL 2023, RCB vs KKR: आरसीबीचे फलंदाज पुन्हा एकदा कोलकात्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले.

IPL 2023, RCB vs KKR:  आरसीबीचे फलंदाज पुन्हा एकदा कोलकात्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. नीतीश राणाच्या नेतृत्वातील केकेआरने आरसीबीचा २१ धावांनी पराभव केला. २०१ धावांचा पाठलाग करताना आरसीबीचा संघाला २० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात १७९ धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहली याने अर्धशतकी खेळी केली, पण इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. लीग सामन्यात कोलकात्याने तिसरा विजय मिळवला. या तीन विजयातील दोन विजय आरसीबीविरोधात मिळवले. फिल्डिंग आणि फलंदाजीमुळे सामना गमावल्याचे विराट कोहलीने सामन्यानंतर सांगितले. आरसीबीचे पाच फलंदाज फिरकी गोलंदाजांच्या चेंडूवर बाद झाले. 

२०१ धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी दमदार सुरुवात केली होती. पहिल्या दोन षटकात ३० धावांचा पाऊस पाडला होता. पण तिसऱ्या षटकात सुयश शर्माने फाफला बाद केले. त्यानंतर शाहबाज अहमदही फार काळ मैदानावर टीकू शकला नाही. शाहबाज अहमद दोन धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल याला पाच धावांवर वरुण चक्रवर्तीने बाद करत आरसीबीच्या अडचणी वाढवल्या. 

पण विराट कोहली आणि महिपाल लोमरोर यांनी आरसीबीचा डाव सावरला. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत विजयाकडे आगेकूच केली. चौथ्या विकेटसाठी दोघांनी ३४ चेंडूत ५५ धावांची भागिदारी केली. आरसीबीची ही सर्वात मोठी भागिदारी होय.. त्याशिवाय इतर कोणताही मोठी भागिदारी झाली नाही.  महिपाल लोमरोर याने १८ चेंडूत ३४ धावांची खेळी केली.  या खेळीत त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. लोमरोर बाद झाल्यानंतर विराट कोहलीही लगेच तंबूत परतला विराट कोहलीने सहा चौकारासह ५४ धावांची खेळी केली. विराट कोहली बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी पुन्हा ढेपाळली. दिनेश कार्तिक याने २२ धावांचे योगदान दिले. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.  सुयेश प्रभुदेसाई याने दहा धावांचे योगदान दिले. हसरंगा, विली आणि वैशाक यांनी आरसीबीचा मोठा पराभव टाळला. 

कोलकात्याची फिरकी गोलंदाजांनी भेदक मारा केला. खासकरुन सुयेश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती यांनी आरसीबीचा अर्धा संघ तंबूत धाडला.  सुयेश शर्माने पावरप्लेमध्ये दोन षटके गोलंदाजी केली. तर वरुण चक्रवर्ती याने डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. सुयश शर्मा याने चार षटकात ३० धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती याने चार षटकात २७ धावांच्या मोबद्लयात तीन विकेट घेतल्या. आंद्रे रसेल याने २९ धावांच्या मोबदल्यात दोन बळी घेतले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP MajhaMedha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Embed widget