IPL 2023 Points Table : लखनौचा पंजाबवर दणदणीत विजय; गुजरातसह चेन्नईलाही झटका, गुणतालिकेतील सध्याची स्थिती काय?
LSG vs PBKS IPL 2023 : लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासोबतच लखनौ संघाने गुणतालिकेत गुजरात आणि चेन्नईला मागे टाकलं आहे.
![IPL 2023 Points Table : लखनौचा पंजाबवर दणदणीत विजय; गुजरातसह चेन्नईलाही झटका, गुणतालिकेतील सध्याची स्थिती काय? IPL 2023 Points Table team position statistics and other records 2023 ipl live marathi news IPL 2023 Points Table : लखनौचा पंजाबवर दणदणीत विजय; गुजरातसह चेन्नईलाही झटका, गुणतालिकेतील सध्याची स्थिती काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/925c311b63866f6f82454c97cda8c8791682733295963322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्सने (LSG) पंजाब किंग्सवर (PBKS) दणदणीत विजय मिळवला. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानावर 56 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सवर मात केली. लखनौ संघानं पंजाबला 258 धावांचं ल्ध्य दिलं होतं. लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवनचा संघ 19.5 षटकांत 201 धावांवर गारद झाला. लखनौनं हा रोमांचक सामना जिंकला. या विजयासोबतच लखनौ संघाने गुणतालिकेत गुजरातला मागे टाकलं आहे. लखनौ संघ आता पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पंजाब किंग्स सहाव्या क्रमांकावर कायम आहे.
लखनौच्या विजयासह गुजरात आणि चेन्नईलाही झटका
लखनौ संघाने विजयासह गुजरात आणि चेन्नई संघालाही झटका दिलं आहे. गुजरात आणि चेन्नई दोन्ही संघांचं गुणतालिकेतील स्थान घसरलं आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने चौथ्या क्रमांकावरुन थेट दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. राजस्थान रॉयल्स संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. गुजरात आणि चेन्नई संघ एक स्थान खाली घसरले आहेत. गुजरात दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे, तर चेन्नईही तिसऱ्या स्थानावरून आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. गुणतालिकेत टॉप 4 संघांकडे प्रत्येकी 10 गुण आहेत.
इतर संघांची परिस्थिती काय?
गुणतालिकेत टॉप 4 संघांकडे प्रत्येकी 10 गुण आहेत. पहिल्या स्थानी असलेल्या राजस्थान संघाकडे 10 गुण असून संघाचा नेट रनरेट 0.939 इतका आहे. दुसऱ्या क्रमांकावरील लखनौ संघाकडे 0.841 नेट रनरेट आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर गतविजेता गुजरात टायटन्स संघ आहे. गुजरात संघाकडेही 10 गुण आणि 0.580 नेट रनरेट आहे. तर चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या चेन्नई संघाकडेही 10 गुण आणि 0.376 नेट रनरेट आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पाचव्या स्थानावर आहे. बंगळुरु संघाने 8 पैकी चार सामन्यात विजय मिळवला असून संघाकडे 8 गुण आणि 0.139 नेट रनरेट आहे.
मुंबई इंडियन्स कोणत्या स्थानावर?
पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. पंजाब किंग्स संघ 7 पैकी 4 सामन्यात विजयानंतर 8 गुण आणि -0.162 नेट रनरेटसह सहाव्या क्रमांकावर आहे. कोलकाता संघाकडे 6 गुण आणि -0.027 नेट रनरेट असून संघ सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स आठव्या क्रमांकावर आहे. मुंबईने आतापर्यंत 7 पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून संघाकडे 6 गुण आणि - 0.620 नेट रनरेट आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ 7 सामन्यांपैकी 2 सामन्यांत विजय मिळवल्यानंतर संघ 4 गुण आणि -0.725 नेट रनरेटसह नवव्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत सर्वात दिल्ली कॅपिटल्स संघ शेवटच्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने 7 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. संघ 4 गुण आणि -0.961 नेट रनरेटसह दहाव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)