CSK vs PBKS Match Preview : चेन्नई विरुद्ध पंजाब, कोणता संघ विजयी मार्गावर परतणार? हेड टू हेड आकडेवारीमध्ये कुणाचं पारड
IPL 2023, CSK vs PBKS Match Prediction : आयपीएल 2023 च्या आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Supar Kings) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे.
CSK vs PBKS Match Preview : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Supar Kings) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) या दोन संघात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. आयपीएल 2023 मधील आजचा सामना चेन्नईच्या घरच्या चेपॉक स्टेडियमवर (Chepauk Stadium) दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. दोन्ही संघांना त्यांच्या मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. शेवटच्या सामन्यात चेन्नई संघाला राजस्थानकडून पराभवाचा सामना करावा लागला तर, पंजाब संघावर लखनौनं मात केली.
IPL 2023 CSK vs PBKS : चेन्नई विरुद्ध पंजाब लढत
आयपीएल गुणतालिकेत चेन्नई सध्या चौथ्या स्थानावर आणि पंजाब सहाव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. चेन्नई संघाने आठ सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पंजाब संघाने आठ पैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये सध्या चेन्नई संघाकडे 10 तर पंजाब संघाकडे 8 गुण आहे.
CSK vs PBKS Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये चेन्नई (CSK) आणि पंजाब (PBKS) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नई संघ वरचढ असल्याचं दिसून येतं. चेन्नई संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 15 सामने जिंकले आहेत. तर पंजाब संघाला 12 सामने जिंकण्यात यश मिळालं.
CSK vs PBKS, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Supar Kings) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात रविवारी, 30 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम (M. A. Chidambaram Stadium) म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर (Chepauk Stadium) दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.