Arijit in IPL : अरिजीतचा धमाकेदार फरफॉर्म, हार्दिकसह चाहत्यांनी दिली दाद
IPL 2023 Opening Ceremony Live : आयपीएलच्या ओपनिंग सरेमनीला सुरुवात झाली आहे.
IPL 2023 Opening Ceremony Live : आयपीएलच्या ओपनिंग सरेमनीला सुरुवात झाली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने स्टेजवर परफॉर्म केलेय. अरिजीतने गिटार हातात घेत गाणे गायले.. अरिजीतच्या आवाजावर नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये उपस्थित असणारे चाहते थिरकले... अरिजीत सिंह याने 'प्यार होता कई बार है' हे गाणे गायले... या गाण्याला उपस्थित असणाऱ्या क्रीडा चाहत्यांनी दाद दिली. त्याशिवाय हार्दिक पांड्या आणि गुजरातमधील इतर खेळाडूही गाणे एन्जॉय करताना दिसले. आयपीएलने अधिकृत ट्विटर खात्यावर अरिजीत सिंह गातानाचा व्हिडीओ पोस्ट केलाय.
अरिजीत सिंह याने हातात गिटार घेऊन आयपीएलच्या ओपनिंग सरेमनीमध्ये गाणे गायले. अरिजीतसोबत स्टेजवर प्रितमही उपस्थित होता. अरिजीतने केसरिया या गाण्यावर परफॉर्म केला. त्याशिवाय 'अपना बना ले पिया' आणि दिल का दरिया हे गाणेही गायली. अरिजीतने गाणे गाण्याआधी उपस्थित प्रेक्षकांची माफी मागतली. इतक्या मोठ्या पब्लिकसमोर कधीच परफॉर्म केला नाही. पहिल्यांदाच ही संधी मिळाली, असे अरिजीतने गाणे गाण्याआधी सांगितले.
आयपीएल ओपनिंग सरेमनी सुरुवात झाली. गुजरात आणि चेन्नई यांच्यात सलामीची लढत होणार आहे. त्याआधी ओपनिंग सरेमनी झाली. हजारो प्रेक्षकांसमोर अरिजीतसह इतर बॉलिवूड कलाकारांनी परफॉर्म केलेय. अरिजीत सिंह याने एका कारमध्ये बसून संपूर्ण स्टेडिअमला फेरी मारली. यावेळी त्याच्या हातात गिटार होती. त्यासोबतच तिरंगाही होता. यावेळी अरिजीत याने जब हैरी मेट सेजल या चित्रपटाचे गाणे म्हटलेय. अरिजीतच्या परफॉर्मवर चाहते थिरकले. गुजरात आणि चेन्नईच्या खेळाडूंनीही अरिजीतच्या परफॉर्मला दाद दिली.
सोशल मीडियावर चाहत्यांनी याबाबतच्या अनेक पोस्ट केल्या आहेत.
𝙈𝙚𝙡𝙤𝙙𝙞𝙤𝙪𝙨!
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
How about that for a performance to kick off the proceedings 🎶🎶@arijitsingh begins the #TATAIPL 2023 Opening Ceremony in some style 👌👌 pic.twitter.com/1ro3KWMUSW
सुमारे पाच वर्षानंतर आयपीएलला उद्घाटन सोहळ्यासह सुरुवात झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटन सोहळा सुरु आहे. याच ठिकाणी यंदाच्या आयपीएलमधील पहिला सामना रंगेल. सामना सुरू होण्याआधी उद्घाटन सोहळा पार पडला आहे. यानंतर 7 वाजता नाणेफेक होईल आणि 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. आयपीएल 2023 मधील पहिला सामना चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचा आणि गतविजेत्या गुजरात टायटन्समध्ये रंगणार आहे.