GT vs CSK, IPL 2023 Live : गुजरातचा चेन्नईवर पाच विकेटने विजय
GT vs CSK Live Score : गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे.
LIVE
![GT vs CSK, IPL 2023 Live : गुजरातचा चेन्नईवर पाच विकेटने विजय GT vs CSK, IPL 2023 Live : गुजरातचा चेन्नईवर पाच विकेटने विजय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/31/0a2be21a478fc1066c1320b43870e1bc1680258126771265_original.jpg)
Background
IPL 2023, Match 1, GT vs CSK : गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे. शुक्रवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. कागदोपत्री दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत. विजयाने सुरुवात करण्याच्या इराद्याने हार्दिक आणि धोनीचे संघ मैदानात उतरतील. पाहूयात दोन्ही संघाबद्दल....
गुजरात टायटन्स -
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने यंदाच्या लिलावत केन विल्यमसन, ओडिन स्मिथ, जोशुआ लिटिल आणि केएस भरत यांना खरेदी केलेय. शुभमन गिल, राशिद खान, डेविड मिलर आणि राहुल तेवतिया यासारखे स्टार खेळाडू आधीच संघात आहेत. डेविड मिलर पहिल्या सामन्यासाठी अनुपलब्ध असेल.. गोलंदाजीत मोहम्मद शमी, राशिद खान, अल्जारी जोसेफ आणि यश दयाल आहेत.. या तिन्ही गोलंदाजांनी गेल्यावर्षी दमदार कामगिरी केली आहेत. त्याशिवाय जयंत यादव आणि साई किशोर यांचाही पर्याय आहे. तर युवा फिरकीपटू नूर अहमद सप्राइज पॅकेज ठरु शकतो. गेल्यावर्षीपेक्षा यंदा गुजरातचा संघ अधिक मजबूत दिसत आहे.
आयपीएल 2023 साठी गुजरात टायटन्सचे संपूर्ण स्क्वाड
हार्दिक पंड्या(कर्णधार), राशिद खान, राहुल तेवतिया, शुभमन गिल, मोहम्मद शमी, शिवम मावी, जोशुआ लिटिल, यश दयाल, डेविड मिलर, आर साई किशोर, अभिनव सदरंगानी, अल्जारी जोसेफ, मॅथ्यू वेड, केन विलियमसन, रिद्धिमान साहा, जयंत यादव , विजय शंकर, केएस भरत, ओडियन स्मिथ, मोहित शर्मा, नूर अहमद, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे, साई सुदर्शन
चेन्नई सुपर किंग्स -
गेल्यावर्षी चेन्नईला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. यंदा बेन स्टोक्स संघासोबत जोडला गेल्यामुळे चेन्नईची ताकद आणखी वाढली आहे. त्याशिवाय संघात एकापेक्षा एक सरस अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. कधीकाळी डॅडीज आर्मी म्हणून ओळखला जाणारा चेन्नई यंदा अष्टपैलू खेळाडूमुळे चर्चेत आहे. स्टोक्स फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल करु शकतो. त्याशिवाय रविंद्र जडेजा आणि मोईन अली यासारखे दर्जेदार अष्टपैलू खेळाडू संघाची ताकद आणखी वाढवतात. मुकेश चौधरीच्या दुखापतीने चेन्नईचे टेन्शन वाढले आहे. गेल्यावर्षी मुकेश चौधरीने अचूक टप्प्यावर मारा केला होता. ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉनवे यंदाही सलामीला दिसतील.. चेन्नईचा सर्वात प्लस पाँईट म्हणजे धोनी होय.. धोनी पुन्हा एकदा चेन्नईचे नेतृत्व करणार आहे.
GT vs CSK : पिच रिपोर्ट
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे तर हार्दिक पांड्या गुजरात संघाचे नेतृत्व करत आहे. दोन्ही संघातील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाकडे अनेक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये तुल्यबळ सामना पाहायला मिळतो. खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात.. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो.. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्षाचा पाठलाग होऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते... पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच.
हेड टू हेड
गुजरात संघाचे आयपीएलमधील दुसरे वर्ष आहे. पहिल्याच वर्षी गुजरात संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. 2022 मध्ये पदार्पणातच गुजरात संघाने आयपीएलवर नाव कोरले. गेल्यावर्षी गुजरात आणि चेन्नई यांच्यात दोन सामने रंगले होते. दोन्ही सामन्यात गुजरात संघाने बाजी मारली होती. पहिल्या सामन्यात तीन तर दुसऱ्या सामन्यात सात विकेटने गुजरातने चेन्नईचा पराभव केला होता.
गुजरातचा चेन्नईवर पाच विकेटने विजय
गुजरातने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला.
गुजरातला मोठा धक्का, विजय शंकर बाद
मोक्याच्या क्षणी गुजरातची विकेट पडली आहे. विजय शंकर बाद झाला.
गुजरातला मोठा धक्का, शुभमन गिल बाद
गुजरातला मोठा धक्का, शुभमन गिल बाद झाला आहे. मोक्याच्या क्षणी गिल बाद झाला आहे. गुजरात चार बाद 138 धावा
गुजरातला मोठा धक्का, हार्दिक पांड्या बाद
रविंद्र जाडेजाने हार्दिक पांड्याला बाद करत गुजरातला मोठा धक्का दिला. हार्दिक पांड्या आठ धावा काढून बाद झाला.
गुजरातला दुसरा धक्का, साई सुदर्शन बाद
साई सुदर्शनच्या रुपाने गुजरातला दुसरा धक्का बसला. हंगाकरेकर याने साई सुदर्शनला बाद केले.साई सुदर्शन 22 धावांवर बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)