IPL 2022: यशस्वीच्या तुफान फलंदाजीवर संजू सॅमसन खूश, देणार मोठं गिफ्ट; राजस्थाननं पोस्ट केला व्हिडिओ
IPL 2022 Marathi News: पंजाब किंग्जविरुद्ध आक्रमक फलंदाजी करणाऱ्या राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वालवर (Yashasvi Jaiswal) कौतुकाचा वर्षाव होतोय.
IPL 2022 Marathi News: पंजाब किंग्जविरुद्ध आक्रमक फलंदाजी करणाऱ्या राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वालवर (Yashasvi Jaiswal) कौतुकाचा वर्षाव होतोय. सुरूवातीच्या काही सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर त्यानं पंजाबविरुद्ध दमदार अर्धशतक ठोकलं. या सामन्यात राजस्थानच्या संघानं विजय मिळवला. या विजयानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं (Sanju Samson) संजू सॅमसनला नवीन बॅट गिफ्ट करण्याची घोषणा केली.
नुकताच राजस्थानच्या संघानं त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलं. ज्यात संजू सॅमसन यशस्वी जैस्वालसोबत बोलताना दिसत आहे. संजू तो चिंता करू नको, आज तुझ्या रूममध्ये नवीन बॅट येईल. तुझ्या मोठ्या भावाकडून तुला नवी बॅट गिफ्ट, असं संजू सॅमसन बोलताना दिसत आहे. यशस्वी जैस्वालला नवीन बॅट देण्याची संजू सॅमसननं घोषणा केल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
राजस्थान रॉयल्सचं ट्वीट-
यशस्वी जैस्वालची युवा स्टार फलंदाजाच्या यादीत समावेश आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामात यशस्वी जैस्वालनं दमदार कामगिरीच्या कामगिरीच्या जोरावर क्रिडाविश्वाचं लक्षं वेधून घेतलं. यंदाच्या हंगामातील सुरूवातीच्या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. परंतु, पंजाबविरुद्ध त्यानं आक्रमक फलंदाजी करत त्याचा फॉर्म परत मिळवला आहे. तसेच पुढील सामन्यात यशस्वी जैस्वाल कशी कामगिरी करतो? यावरही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हे देखील वाचा-