IPL 2022: उमरान मलिक इतर वेगवान गोलंदाजांपेक्षा वेगळा कसा? इयान बिशपनं सांगितलं कारण
Ian Bishop on umran Malik: आयपीएलचा पंधरावा हंगाम (IPL 2022) सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकसाठी चांगला ठरला आहे. त्यानं आपल्या वेगानं क्रिडाविश्वाचं लक्ष वेधलं आहे.
Ian Bishop on umran Malik: आयपीएलचा पंधरावा हंगाम (IPL 2022) सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकसाठी चांगला ठरला आहे. त्यानं आपल्या वेगानं क्रिडाविश्वाचं लक्ष वेधलं आहे. या हंगामात तो सतत 150 किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी करत आहे. या हंगामात त्यानं 18 विकेट्सही घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी टी-20 मालिकेत त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात यावा, अशा मागणींनी जोर धरला आहे. यातच वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशपनं उमरान मलिकबाबत आपलं मत मांडलं आहे. उमरान मलिक इतर भारतीय वेगवान गोलंदाजांपेक्षा वेगळा कसा? याचं कारणंही त्यांनी सांगितलं आहे.
चौकार पडल्यानंतरही उमरान दबावात दिसत नाही
उमरान मलिकबद्दल बोलताना तो म्हणाला की "उमरानचा वेग त्याला इतर गोलंदाजांपेक्षा वेगळा करतो. आयपीएलमध्ये त्यानं उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. प्रत्येक सामन्यात त्याचं गोलंदाजीवर नियंत्रण असल्याचं दिसलं. गोलंदाजीचा वेग कमी न करता तो आपल्या कौशल्यावर काम करत आहे. तो आपल्या खेळात झपाट्यानं सुधारणा करत आहे. चौकार मारल्यानंतरही तो त्याच वेगानं चेंडू फेकत आहे. त्यातून त्यांची वृत्ती दिसून येते. त्याच्या या वृत्तीमुळं तो टी-20 क्रिकेटमध्ये यशस्वी होत आहे."
उमरान मलिकची उत्तम कामगिरी
पुढे इयान बिशप म्हणाले की, "टी-20 हा वेगवान खेळ आहे. टी-20 क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमचे खराब षटक विसरून पुढे जावं लागतं आणि चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागतो. उमरान मलिकही तेच करताना दिसत आहे. तो अजूनही आपल्या खेळात सुधारणा करतोय हेदेखील मान्य करावं लागेल. भारतीय संघात स्थान मिळवण्यापासून तो काहीच अंतर दूर आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हे देखील वाचा-