IPL 2022: मुंबईचा विजय बंगळुरूसाठी प्लेऑफचा एन्ट्री पास, जाणून घ्या कसं असेल संपूर्ण समीकरण
IPL 2022: आयपीएल 2022 च्या 64 व्या सामन्यात काल (16 मे) दिल्लीच्या संघानं पंजाब किंग्जला 17 धावांनी पराभूत केलं. दिल्लीच्या विजयात मिचेश मार्श आणि शार्दूल ठाकूरनं महत्वाची भूमिका बजावली.
IPL 2022: आयपीएल 2022 च्या 64 व्या सामन्यात काल (16 मे) दिल्लीच्या संघानं पंजाब किंग्जला 17 धावांनी पराभूत केलं. दिल्लीच्या विजयात मिचेश मार्श आणि शार्दूल ठाकूरनं महत्वाची भूमिका बजावली. या विजयानंतर प्लेऑफची शर्यत खूपच रंजक बनली आहे. आतापर्यंत केवळ गुजरात टायटन्सचा संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करू शकला आहेत. तर, चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. परंतु, मुंबईच्या संघाला त्यांचे उर्वरित दोन सामने खेळायचे आहेत. मुंबई इंडियन्सच्या सामन्यावर बंगळुरूचं भवितव्य अवलंबून असेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये स्थान मिळण्याची शक्यता
मुंबईचा संघ त्यांचा अखेरचा सामना 21 मे ला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात मुंबईच्या संघानं दिल्लीला पराभूत केल्यास बंगळुरूच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा उंचावतील. तसेच बंगळुरूला त्यांच्या अखेरच्या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करणं अनिवार्य असेल. मुंबईनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा शेवटचा लीग सामना गमावला, बंगळुरूच्या प्लेऑफच्या आशा धुळीस मिळू शकतात.
आयपीएल 2022 गुणतालिका-
क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | नेट रन रेट | गुण |
1 | गुजरात टाययन्स | 12 | 9 | 3 | 0.376 | 18 |
2 | लखनौ सुपर जायंट्स | 12 | 8 | 4 | 0.385 | 16 |
3 | राजस्थान रॉयल्स | 12 | 7 | 5 | 0.228 | 14 |
4 | रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू | 12 | 7 | 5 | -0.115 | 14 |
5 | दिल्ली कॅपिटल्स | 12 | 6 | 6 | 0.210 | 12 |
6 | सनरायजर्स हैदराबाद | 11 | 5 | 6 | -0.31 | 10 |
7 | कोलकाता नाईट रायडर्स | 12 | 5 | 7 | -0.057 | 10 |
8 | पंजाब किंग्ज | 11 | 5 | 6 | -0.231 | 10 |
9 | चेन्नई सुपरकिंग्ज | 12 | 4 | 8 | -0.181 | 8 |
10 | मुंबई इंडियन्स | 12 | 3 | 9 | -0.613 | 6 |
बंगळुरूचा नेट रनरेट अतिशय खराब
लखनौ सुपर जॉइंट्सचे सध्या 16 गुण आहेत. मात्र, तरीही लखनौचा संघ प्लेऑफमध्ये जागा निश्चित करू शकला नाही. लखनौचा संघ त्यांचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर लखनौच्या संघाचं प्लेऑमधील स्थान पक्क होईल. बंगळुरूचे 14 गुण आहेत. परंतु, त्यांचा नेट रन रेट खूपच खराब आहे. त्यामुळं बंगळुरूला प्लेऑफसाठीचा आपला दावा मजबूत करण्यासाठी गुजरातविरुद्ध सामना जिंकावा लागेल. एवढेच नव्हेतर, मुंबईच्या संघाला त्यांच्या अखेरच्या सामन्यात दिल्लीला पराभूत करणं गजचेचं आहे.
हे देखील-
- Shikhar Dhawan: शिखर धवनची थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री? 'या' दिवशी त्याचा पहिला चित्रपट होणार प्रदर्शित
- MI vs SRH, Pitch Report : मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
- IPL 2022 : मुंबईच्या युवा खेळाडूची दमदार कामगिरी, सुनील गावस्कर म्हणतात, 'भारतासाठी सर्व फॉर्मेटमध्ये करु शकतो फलंदाजी'