MI vs SRH, IPL 2022: मुंबई- हैदराबादच्या संघात दोन मोठे बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
MI vs SRH, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 65 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) आमने- सामने आले आहेत.

MI vs SRH, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 65 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) आमने- सामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाचा हंगामात मुंबईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. मुंबईनं 12 पैकी नऊ सामने गमावले आहेत. तर, त्यांना फक्त तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. दुसरीकडं हैदराबादच्या संघानं 12 पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, सात सामने गमावले आहेत. अजूनही हैदराबादच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा जिवंत आहे.
मुंबई- हैदराबाद हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये आजवर मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही संघ 17 वेळा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता दोन्ही संघात अतिशय अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे. दरम्यान, मुंबईच्या संघानं नऊ सामन्यात विजय मिळवला आहे. तर, हैदराबादच्या संघाला आठ वेळा मुंबईच्या संघाला पराभूत करता आलं आहे. यंदाचा हंगाम मुंबईच्या संघासाठी खराब ठरला आहे. ज्यामुळं मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडं प्लेऑफचं आव्हान टिकवण्यासाठी हैदराबादचा संघ मुंबईविरुद्ध आजचा सामना खेळणार आहे. यामुळं आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
संघ-
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन:
अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, एफ फारुकी, उमरान मलिक, टी नटराजन.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन:
इशान किशन (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), डॅनियल सॅम्स, तिळक वर्मा, रमणदीप सिंह, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, संजय यादव, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, मयंक मार्कंडे.
हे देखील वाचा-




















