IPL 2022, RR vs RCB: दिनेश-शाहबाजची रॉयल खेळी, राजस्थानचा चार गड्यांनी पराभव
IPL 2022, RR vs RCB : दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांच्या वादळी खेळीच्या बळावर आरसीबीने राजस्थानचा चार विकेटनं पराभव केला.
IPL 2022, RR vs RCB : दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांच्या वादळी खेळीच्या बळावर आरसीबीने राजस्थानचा चार विकेटनं पराभव केला. राजस्थानने दिलेले 170 धावांचे आव्हान आरसीबीने सहा गड्यांच्या मोबदल्यात पार केले. आरसीबीकडून चहल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. चहलने दोन विकेट घेतल्या.
आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 169 धावा केल्या. राजस्थानकडून सलामी फलंदाज जोस बटलरने 70 धावांची खेळी केली. तर शिमरोन हेटमायर आणि देवद्दत पडिकल यांनी छोटीखानी खेळी करत संघाची धावसंख्या वाढवली. पडिकलने 37 तर हेटमायरने 42 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. डेविड विली, वानंदु हसरंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
170 धावांच्या आव्हनाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात आश्वासक झाली होती. पण कर्णधार फाफ डु प्लेसिस बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव कोसळला. एकापाठोपाठ एक विकेट पडत गेल्या. डु प्लेसिसपाठोपाठ अनुज रावत, विराट कोहली, डेविड विली आणि रुदरफोर्ड लागोपाठ बाद झाले. त्यामुळे आरसीबी पराभवाच्या छायेत होता. पण मोक्याच्या क्षणी शाहबाद अहमद आणि दिनेश कार्तिक यांनी संघाचा डाव सावरला. शाहबाद अहमद आणि दिनेश कार्तिक यांनी आरसीबीसाठी विजय खेचून आणला. कार्तिक आणि शाहबाद यांनी 33 चेंडूत वादळी 67 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर आरसीबीला विजय मिळाला. दिनेश कार्तिकने 23 चेंडूत 44 तर शाहबाजने 26 चेंडूत 45 धावांची खेळी केली. राजस्थानकडून चहल सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. चहलने चार षटकांत फक्त 15 धावा देत दोन विकेट घेतल्या. याशिवाय ट्रेंट बोल्डने दोन विकेट घेतल्या. तर नवदीप सैनीने एक विकेट घेतली.
हे देखील वाचा-