IPL 2022 : लखनौ-अहमदाबादमध्ये रंगणार आयपीएलचे उर्वरित सामने?
IPL 2022 चे उर्वरित प्लेऑफ, एलिमिनेटर आणि फायनल सामने लखनौ आणि अहमदाबादच्या स्टेडियममध्ये होण्याची शक्यता
IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगमातील लीग सामने मुंबई आणि पुण्यातील चार स्टेडिअममध्ये सुरु आहेत. कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर एकाच ठिकाणी सामने आयोजित करण्यात आले आहे. पण आता देशातील कोरोनाचा विळखा हळूहळू कमी होत आहे, त्यामुळे आयपीएलचे उर्वरित सामने लखनौ आणि अहमदाबाद येथील मैदानावर होण्याची शक्यता आहे. यावर आयपीएलची कमिटी विचार करत आहे. प्लेऑफ, एलिमनेटर आणि फायनलचा थरार या मैदानावर होण्याची शक्यता आहे.
आयपीएलचे उर्वरित सामने महाराष्ट्राबाहेर होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये अहमदाबाद आणि लखनौच्या मैदानाची जोरदार चर्चा सुरु आहे. BCCI चा एका अधिकारीने स्पोर्ट्स वेबसाइट इनसाइड स्पोर्ट्ससोबत बोलताना सांगितले की, अद्याप कोणताही निर्णय घेतला जाणार आहे. अनेक ठिकाणाचा विचार केला जात आहे. सध्या भारतातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी होत आहे, ही आपल्यासाठी सकारात्मक बाब आहे. त्यामुळे पुढील आठवड्यांपर्यंत मैदान ठरवले जाणार आहे. याबाबतची लवकरच घोषणा केली जाईल.
कोरोना महामारीचा उद्रेक असताना बीसीसीआयने आयपीएलच्या लीग सामन्याबाबत निर्णय घेतला होता. आता आयपीएलच्या उर्वरित सामन्यासाठी मैदानाचा विचार केला जात आहे. आयपीएलमध्ये सध्या सुरु असलेल्या सामन्यादरम्यान एकाही स्टाफ, खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त नाही. त्यातच देशामध्ये कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यामुळे BCCI प्लेऑफ आणि फायनलसाठी महाराष्ट्राच्या बाहेर विचार करू शकते. जरं अस होत असेल तर दोन प्लेऑफ आणि एक एलिमिनेटर सामना आणि फायनल सामन्यासाठी लखनौ आणि अहमदाबाद या मैदानाचा विचार होणार आहे. यामध्ये अहमदाबाद सर्वात पुढे आहे. कारण अहमादाबद जगातील सर्वात मोठं क्रिकेटचं मैदान आहे, तसेच प्रेक्षकांची क्षमताही जास्त आहे. त्यामुळे बीसीसीआय या मैदानाचा सर्वात आधी विचार करु शकते.
हे देखील वाचा-