पराभवानंतर राजस्थानला आणखी एक धक्का, अष्टपैलू खेळाडू आयपीएलमधून बाहेर
IPL 2022 : बेंगलोरने राजस्थानचा चार विकेटनं पराभव केला होता. या धक्क्यानंतर राजस्थानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
IPL 2022 : मंगळवारी बेंगलोरसोबत झालेल्या सामन्यात राजस्थानला पराभवाचा धक्का बसला होता. बेंगलोरने राजस्थानचा चार विकेटनं पराभव केला होता. या धक्क्यानंतर राजस्थानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलला मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू नॅथन कुल्टर नाईल दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. राजस्थान रॉयलने ट्वीट करत याची माहिती दिली आहे.
आयपीएलच्या 15 व्या हंगमाआधी झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने नॅथन कुल्टर नाईलला खरेदी केले होते. आयपीएलच्या यंदाच्या हंगमातील राजस्थानच्या पहिल्या सामन्यात कुल्टार नाईल संघाचा भाग होता. या सामन्यात राजस्थान संघाने हैदराबाद संघाचा 61 धावांनी पराभव केला होता. या सामन्यावेळी नॅथन कुल्टर नाईलला दुखापत झाली होती. कुल्टर नाईलला या सामन्यात चार षटकेही टाकता आली नव्हती. नॅथन कुल्टर नाईलच्या जागी राजस्थान संघाने नवदीप सैनीला संधी दिली. बुधवारी राजस्थान संघाने ट्वीट करत नॅथन कुल्टर नाईल दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलला मुकणार असल्याची माहिती दिली आहे.
राजस्थान संघाचे ट्वीट -
Until we meet again, NCN. 💗
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 6, 2022
Speedy recovery. 🤗#RoyalsFamily | #HallaBol | @coulta13 pic.twitter.com/XlcFUcTg5L
राजस्थान रॉयल्सने आयपीएल लिलावात नॅथन कूल्टर नाइलला दोन कोटी रुपयांत खरेदी केले होते. आयपीएलच्या 15 व्या हंगमातील राजस्थान संघाच्या पहिल्या सामन्यात नॅथन कुल्टर नाईलने तीन षटके गोलंदाजी केली होती. या तीन षटकात नॅथन कुल्टर नाईलने 48 धावा दिल्या होत्या. आयपीएलमध्ये नॅथन कुल्टर नाईल याआधी कोलकाता आणि मुंबईसारख्या संघाचा भाग राहिला आहे. त्याने आतापर्यंत 38 सामन्यात 48 विकेट घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-