IPL 2022 Punjab vs Bangalore : आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना पंजाब किंग्जशी, विराटच्या कामगिरीकडं सर्वांच्या नजरा
आयपीएलमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore ) आणि पंजाब किंग्जशी (Punjab Kings) यांच्यात सामना होणार आहे. ही आयपीएलमधील तिसरा सामना आहे.
IPL 2022 Punjab vs Bangalore : आज आयपीएलमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore ) आणि पंजाब किंग्जशी (Punjab Kings) यांच्यात सामना होणार आहे. ही आयपीएलमधील तिसरा सामना आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीच्या फलंदाजीकडे असणार आहेत. कारण कर्णधारपद सोडल्यानंतर आता दडपणमुक्त खेळणार आहे. त्यामुळं तो कशी खेळी करणार याकडं चाहत्यांचं लक्ष लागलंय. या सामन्यात फॅफ ड्यू प्लेसिस आणि मयांक अगरवाल यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
2016 मध्ये बंगळुरुने उपविजेतेपदापर्यंत मजल मारली होती. हीच बंगळूरुची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्या हंगामात विराटने 900 हून अधिक धावा काढताना चार अर्धशतके नोंदवली होती. याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी कोहली उत्सुक आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड यांची उणीव बंगळूरु संघाला भासणार आहे. मात्र, अष्टपैलू वानिंदू हसरंगाच्या कामगिरीविषयी उत्सुकता असणार आहे. दरम्यान, कालपासून आयपीएलच्या 15 व्या सत्राला प्रारंभ झाला. काल आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात कोलकाता संघाने विजयानं केली. चेन्नईनं दिलेलं 132 धावांचे आव्हान कोलकाता संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
गेल्या महिन्यात झालेल्या मेगा लिलावात दक्षिण आफ्रिकेच्या डु प्लेसिसला आरसीबीने 7 कोटी रुपयांना विकत घेतले होते. 37 वर्षीय डु प्लेसिस आणखी काही वर्षे खेळू शकणार आहे. त्याच्या कामगिरीकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे. आरसीबीला पहिल्या काही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूडची उणीव भासणार आहे. मॅक्सवेल लग्नासाठी बाहेर आहे तर हेजलवूड पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघात आहे. आजचा हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: