एक्स्प्लोर

IPL 2022: आरसीबीविरुद्ध रोमांचक सामन्यात पंजाबचा विजय, 206 धावांचं लक्ष्य 6 बॉल राखून गाठलं

IPL 2022: मुंबईच्या डी. वाय स्डेडिअमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघानं आरसीबीला 5 विकेट्सनं परभूत केलंय.

IPL 2022: मुंबईच्या डी. वाय स्डेडिअमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघानं आरसीबीला 5 विकेट्सनं परभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाबसमोर 206 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिलाय. 

नाणेफेक गमवल्यानंतर मैदानात आलेल्या आरसीबीच्या संघाची आक्रमक सुरुवात केली. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि अनूज रावत यांनी पहिल्या विकेट्ससाठी 50 धावांची भागीदारी केली. त्यानंतर राहुल चाहरनं अनूज रावतच्या रुपात आरसीबीला पहिला झटका दिला. त्यानंतर डू प्लेसिसनं विराट कोहलीसोबत मिळून 118 धावांची केली. दरम्यान, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहनं आठराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसची विस्फोट खेळी संपुष्टात आणली.  त्यांतनंतर विराट कोहली आणि दिनेश कार्तिकनंही आक्रमक खेळी दाखवत संघाचा डाव 200 पार पाठवला. विराट कोहलीनं 29 चेंडूत 41 तर, दिनेश कार्तिकनं 14 चेंडूत 32 धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.

या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीच्या संघाकडून मैदानात उतरलेल्या कर्णधार मयांक अग्रवाल आणि शिखर धवननं संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 71 धावांची भागेदारी केली. त्यानंतर वानिंदू हसरंगानं पंजाबच्या संघाला पहिला झटका दिला. मयांक अग्रवालनं 24 बॉलमध्ये 32 धावा केल्या. त्यानंतर भानूका राजापक्क्ष मैदानात आला. शिखर धवनसोबत मिळून त्यानं खेळ पुढे चालवला. दरम्यान, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर शिखर धवन झेलबाद झाला. शिखरपाठोपाठ राज बावाही शून्यावर बाद झाला. पंजाबनं हा सामना गमावला असं वाटत असताना शाहरूख खान आणि ओडियन स्मिथनं आक्रमक फलंदाजी करत सामना फिरवला. शाहरूख खाननं 20 बॉलमध्ये 24 तर, ओडियन स्मिथनं 8 बॉलमध्ये 25 धावा केल्या. ज्यामुळं पंजाबच्या संघाला 5 विकेट्स राखून आरसीबीवर विजय मिळवता आलाय. आरसीबीकडून मोहम्मद सिराजनं दोन विकेट्स मिळवल्या. तर, आकाश दिप, वानिंदु हसरंगा आणि हर्षल पटेलनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली. 

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावाUddhav Thackeray vs Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंची टीका, देवेंद्र फडवीसांचा पलटवारMaharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 18 May 2024Suhas Palshikar Majha Katta:युती की मविआ, राज्याची हवा कुणाच्याबाजूने? पळशीकरांचं विश्लेषण 'कट्टा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
Embed widget