IPL 2022: लियाम लिव्हिंगस्टोननं मोहम्मद शामीचा चेंडू स्टेडियमबाहेर पाठवला, ठोकला आयपीएलमधील सर्वात लांब षटकार
IPL 2022: लियाम लिव्हिंगस्टोननं (Liam Livingstone) मंगळवारी डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरातविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात सर्वात लांब षटकार ठोकला.
IPL 2022: लियाम लिव्हिंगस्टोननं (Liam Livingstone) मंगळवारी डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरातविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात सर्वात लांब षटकार ठोकला. लियाम लिव्हिंगस्टोननं सामन्याच्या 16व्या षटकात मोहम्मद शमीला लक्ष्य केले आणि लागोपाठ तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. या षटकाचा पहिला चेंडू त्यानं स्टेडियमबाहेर पाठवलास, जो आयपीएल 2022 मधील सर्वात लांब षटकार ठरला आहे.
पंजाबचा गुजरातवर आठ विकेट्सनं विजय
मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियम मैदानावर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 48 व्या सामन्यात पंजाब किंग्जनं गुजरात टायटन्सला आठ विकेट्सनं पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गुजरातच्या संघानं 20 षटकात आठ विकेट्स गमावून 142 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबच्या संघानं 16 व्या षटकातचं गुजरातनं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. तर, शिखर धवन (Shikhar Dhawan) पंजाबच्या विजयाच्या शिल्पकार ठरला.
आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत पंजाबचा संघ कितव्या क्रमांकावर?
गुजरातविरुद्ध सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोननं 10 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या आहेत. ज्यामुळं पंजाबच्या संघानं आठ विकेट्स राखून गुजरातला पराभूत केलं आहे. या विजयानंतर पंजाबचा संघ 10 सामन्यांत पाच विजयांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. गुजरातचा 10 सामन्यांमधला हा दुसरा पराभव आहे. मात्र, तरीही गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे.
मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर लियाम लिव्हिंगस्टोनं मारला उत्तुंग षटकार
पंजाबच्या डावातील 16 व्या षटकात लियाम लिव्हिंगस्टोनने मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर 117 मीटर अंतरावर षटकार ठोकला आहे. जो आयपीएल 2022 मधील सर्वात लांब षटकार ठरला आहे. लिव्हिंगस्टोनचा हा शॉट पाहून समालोचक, चाहते आणि खेळाडू थक्क झाले. यंदाच्या हंगामात लिव्हिंगस्टोनं 100 मीटर पेक्षा लांब षटकार मारण्याची तिसरी वेळ आहे.
हे देखील वाचा-