एक्स्प्लोर

Top 10 Key Points : मुंबईचा पाच गड्याने विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

CSK vs MI, IPL 2022 : डॅनिअल सॅम्स आणि तिलक वर्मा मुंबईच्या विजयाचे शिल्पकार झाले. आज झालेल्या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवूयात... 

CSK vs MI, IPL 2022 : डॅनिअल सॅम्सच्या भेदक माऱ्यानंतर तिलक वर्माच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने चेन्नईचा पाच गड्यांनी पराभव केला.  तिलक वर्माच्या 34 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने चेन्नईवर पाच गड्यांनी विजय मिळवलाय. चेन्नईने दिलेल्या 98 धावांच्या आव्हानाचा मुंबईने यशस्वी पाठलाग केला. मुंबईने 14.5 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा केल्या. डॅनिअल सॅम्स आणि तिलक वर्मा मुंबईच्या विजयाचे शिल्पकार झाले. आज झालेल्या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवूयात... 

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

मुंबईच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत चेन्नईच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. मुंबईच्या वेगवान माऱ्यापुढे चेन्नईची फलंदाजी कोलमडली. चेन्नई संघाने पावरप्लेमध्ये 30 धावांच्या आत 5 गडी गमावले होते. 

धोनीच्या एकाकी खेळीच्या बळावर चेन्नई 97 धावांपर्यंत पोहचली. चेन्नईच्या संघाला 20 षटके फलंदाजाही करता आली नाही. डॅनिअल सॅम्सने सुरुवातील चेन्नईला तीन धक्के दिले.. त्यानंतर बुमराह आणि रायली मॅरिडेथ यांनी विकेट घेत अडचणीत टाकले.. चेन्नईची फलंदाजी कोसळत असताना त्यात कार्तिकेये यानेही भेदक मारा करत चेन्नईची अवस्था आणखी वाट केली. 
 
चेन्नईचे सर्वच खेळाडू एकामागे एक तंबूत परतत होते. कॉन्वे, मोईन अली आणि महेश तीक्षणा तर शून्यावर बाद झाले. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मात्र एकहाती अखेरपर्यंत झुंज देत संघाला किमान 97 धावांपर्यंत पोहोचवलं. धोनीने 33 चेंडूत नाबाद 36 धावांची छोटी पण महत्त्वपूर्ण खेळी केली.  

डॅनियल सॅम्सने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 4 षटकात 16 धावा देत 3 विकेट्स नावे केल्या आहेत. तर रिले मेरिडेथ आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले आहेत. रमनदीप यानेही एक षटक टाकत 5 धावा देत एकच विकेट घेतली आहे. बुमराहनेही एक विकेट घेतली. 

चेन्नईने दिलेल्या मापक आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवातही खराब झाली. मुंबईचे सलामी फलंदाज झटपट माघारी गेले. चेन्नईप्रमाणे मुंबईच्या फलंदाजांची दैणा झाली. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले.

ईशान किशन 6, रोहित शर्मा 18, डॅनिअल सॅम्स 1, पदार्पण करणारा स्टब्स 0 यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. एकाबाजूला विकेट पडत असताना तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरला. 

तिलक वर्माने एकाकी झुंज देत मुंबईला तिसरा विजय मिळवून दिला. तिलक वर्माने नाबाद 34 धावांची खेळी केली. टीम डेविडने 16 धावांची छोटेखानी मॅचविनिंग खेळी केली. दोन्ही डावात मिळून फक्त 5 षटकार लगावले गेले. यामध्ये चेन्नईने तीन तर मुंबईने दोन षटकार मारलेत. 

चेन्नईकडून मुकेश चौधरी आणि समजीत सिंह यांनी पहिल्या 8 षटकात भेदक मारा केला. या दोघांच्या गोलंदाजीपुढे मुंबईचे फलंदाज हतबल झाले होते. मुकेश चौधरीने तीन विकेट घेतल्या. तर समरजीत सिंहला एक विकेट मिळाली. मोईन अलीनेही एक विकेट घेतली. 

यंदाच्या हंगामातील मुंबईचा हा तिसरा विजय होय.. तर चेन्नईचा आठवा पराभव झालाय. या पराभवासह चेन्नईचं यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आलेय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget