मुंबईचा विजय होताच विराट कोहलीनं केले ट्वीट, आरसीबीच्या खेळाडूंचं जंगी सेलिब्रेशन
IPL 2022 : अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईने दिल्लीचा पाच विकेटने पराभव करत यंदाच्या आयपीएलचा शेवट गोड केलाय.
Mumbai Indians vs Delhi Capitals : अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईने दिल्लीचा पाच विकेटने पराभव करत यंदाच्या आयपीएलचा शेवट गोड केलाय. दिल्लीने दिलेले 160 धावांचे आव्हान मुंबईने पाच गडी राखून पूर्ण केले. मुंबईची यंदीची कामगिरी निराशाजनक राहिली असली तरी शेवट गोड केलाय. या पराभवासह दिल्लीचे प्लेऑफचं स्वप्न तुटले आहे. मुंबईच्या विजयामुळे आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहचला. मुंबईच्या विजयानंतर वानखेडेवर आरसीबी आरसीबीच्या घोषणा सुरु झाल्या होत्या. तर मैदानाबाहेरही आरसीबीच्या चाहत्यांनी सेलिब्रेशन केले.
आरसीबीने आपल्या अधिकृत खात्यावर आरसीबी संघाच्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. तसेच मुंबई इंडियन्सला धन्यवादही म्हटलेय. त्याशिवाय विराट कोहलीनेही ट्विट करत मुंबईचे आभार व्यक्त केले आहे. मुंबई दिल्ली सामन्याकडे आरसीबी संघासह चाहतेही डोळे लावून बसले होते. मुंबईच्या विजयामुळे आरसीबीचा प्लेऑफमध्ये पोहचलाय.
THANK YOU, @mipaltan! 💙#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #MIvDC
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 21, 2022
ABSOLUTE SCENES! ❤️🥳🥳#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #Playoffs #MIvDC pic.twitter.com/GLmIsbE5vQ
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 21, 2022
✈️ Kolkata @mipaltan 🤝 @RCBTweets
— Virat Kohli (@imVkohli) May 21, 2022
We love you @timdavid8! ❤️
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 21, 2022
You’re doing great. More power to you. 🙌🏻#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/uKV5zqFUqu
😛
— cricket.com.au (@cricketcomau) May 21, 2022
Maxi, Faf and Virat pretty happy with Mumbai's win over Delhi. https://t.co/laFFX4dY9s pic.twitter.com/v11PiOEycg
रोमांचक सामन्यात मुंबईचा विजय -
160 धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा संघर्ष करताना पाहायाला मिळला. रोहित शर्मा 13 चेंडूत दोन धावा काढून बाद झाला. त्यानंतर ईशान किशन आणि डोवॉल्ड ब्रेविस यांनी मुंबईचा डाव सावरला. दोंघानी दुसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागिदारी केली. इशान किशन 48 धावांवर बाद झाला. त्यानंतर डेवॉल्ड ब्रेविसही 37 धावा काढून बाद झाला. टीम डेविड आणि तिलक वर्मा यांनी मुंबईचा विजय दृष्टीक्षेपात आणला. मुंबई जिंकणार असे वाटत असतानाच दोघेही बाद झाले. त्यानंतर डॅनिअल सॅम्स आणि रमनदीप सिंह यांनी मुंबईला विजय मिळवून दिला. इशन किशन ४८, रोहित शर्मा २, डेवॉल्ड ब्रेविस ३७, तिलक वर्मा २१, टीम डेविड ३४ रमनदीप सिंह १३ यांनी महत्वाची खेळी केली. दिल्लीकडून नॉर्त्जे आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवला एक विकेट मिळाली.
जसप्रीत बुमराहसह रमनदीप सिंह (Ramandeep Singh), डेनियल सॅम्स (Daniel Sams) आणि मयंक मार्कंडे (Mayank Markande) आणि चांगली गोंलदाजी केली. ज्यामुळं दिल्लीच्या संघाला 20 षटकात सात विकेट्स गमावून 159 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलनं (Rovman Powell) सर्वाधिक 43 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. दिल्लीच्या डावातील तिसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहनं डेव्हिड वार्नरच्या (5 धावा) रुपात दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर मिचेश मार्शही (0 धाव) डेनियल सॅम्सच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉ (24 धावा) आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या करेल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, तोही पावर प्लेच्या अखेरच्या षटकात बाद झाला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं सघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही संघाची धावसंख्या पुढे नेता आली नाही. त्यानं 33 चेंडूत 39 धावा केल्या. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलनं सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. ज्यात चार षटकार आणि एक चौकाराचा समावेश होता. रोव्हमन पॉवेल बाद झाल्यानंतर दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, रमनदीप सिंहला दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, डेनियल्स सॅम्स, मयांक मार्कंडेय यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.