IPL 2022 Mega Auction : वॉर्नर-धवनपासून रबाडा-अश्विनपर्यंत; कोणत्या खेळाडूची किती आहे बेस प्राइज, पाहा संपूर्ण यादी
IPL 2022 Update : मेगा लिलावाचा भाग होण्यासाठी एकूण 1,214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यात 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
IPL 2022 Update : येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला आयपीएलचं मेगा ऑक्शन होणार आहे. आयपीएल 2022 साठी मेगा लिलावाचा भाग होण्यासाठी एकूण 1,214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यात 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 1214 खेळाडूंमध्ये 270 खेळाडूंनी राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि 103 खेळाडू अनकॅप आहेत. तर, 41 खेळाडू कॅप खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकासह स्कॉटलँड आणि यूएईमधील खेळाडूंनीही आपली नोंदणी केली आहे. जो रुट, ख्रिस गेल, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, सॅम करन, मिचेल स्टार्क आणि ख्रिस वोक्स या स्टार खेळाडूंनी आयपीएलच्या लिलावातून आपलं नाव माघारी घेतलं आहे.
कोणत्या देशातील किती खेळाडूंनी नोंदवलं नाव
ऑस्ट्रेलिया (59), दक्षिण आफ्रिका (48), वेस्ट इंडीज (41), श्रीलंका (36), इंग्लंड (30), न्यूझीलंड (29), अफगाणिस्तान (20), नेपाळ (15), अमेरिका (15), बांगलादेश (09), नामिबिया (05), आयर्लंड (03), ओमान (03), झिम्बाब्वे (02), भुटान (01), नेदरलँड्स (01), स्कॉटलँड (01) आणि यूएई (01).
प्रत्येक संघात 25 खेळाडू -
आयपीएलच्या मेगा लिलावात 49 खेळाडूंची बेस प्राइज दोन कोटी रुपये इतकी ठेण्यात आली आहे. यामध्ये 17 भारतीय आणि 32 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये स्टार फलंदाज शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, सुरेश रैना यांचा समावेश आहे. याशिवाय बेस प्राइस 1.5 कोटी रुपये आहे यामध्येही अनेक खेळाडूंचा समावेस आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक फ्रेंचाइजीला आपल्या संघात 25 खेळाडूंना ठेवू शकतो.
दोन कोटी बेस प्राईज असणारे खेळाडू -
रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, शिखर धवन, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ईशान किशन, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, क्रुणाल पंड्या, हर्षल पटेल, सुरेश रैना, अंबती रायुडू, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, रॉबिन उथप्पा, उमेश यादव, मुजीब जादरान, एस्टन एगर, नाथन कुल्टर नाइल, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर, एडम जम्पा, शाकिब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, सॅम बिलिंग्स, साकिब महमूद, ख्रिस जॉर्डन, क्रेग ओवर्टन, आदिल राशिद, जेसन रॉय, लॉकी फर्ग्युसन, क्विंटन डिकॉक, मर्चेंट डे लैंगे, फाफ डु प्लेसिस, कैगिसो रबाडा, इमरान ताहिर, फॅबिएन एलेन, ड्वेन ब्रावो, एविन लुइस, ओडियन स्मिथ.
1.5 कोटी बेस प्राइज असणारे खेळाडू -
अमित मिश्रा, इशांत शर्मा, वाशिंगटन सुंदर, अॅरोन फिंच, ख्रिस लीन, नाथन लियोन, केन रिचर्डसन, जॉनी बेयरस्टो, एलेक्स हेल्स, इयोन मोर्गन, डेविड मलान, एडम मिल्ने, कॉलिन मुनरो, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, टिम साउथी, कॉलिन इनग्राम , शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, निकोलस पूरन.
1 कोटी बेस प्राइज असणारे खेळाडू -
पियुष चावला, केदार जाधव, प्रसिद्ध कृष्णा, टी नटराजन, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, रिद्धिमान साहा, कुलदीप यादव, जयंत यादव, मोहम्मद नबी, जेम्स फॉल्कनर, मोइसेस हेनरिक्स, मार्नस लाबुस्चगने, रिले मेरेडिथ, जोश फिलिप, डी' आर्सी शॉर्ट, एंड्रयू टाय, डॅन लॉरेन्स, लियाम लिविंगस्टोन, टायमल मिल्स, ओली पोप, डेवोन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, मिशेल सेंटनर, अॅडेन मार्करम, रिले रोसौव, तबरेज शम्सी, रस्सी वॅन डेर डूसन, वानिंदु हसरंगा, रोस्टन चेज, शेरफेन रदरफोर्ड.