IPL 2022, LSG vs CSK Match Highlights : लखनौचा चेन्नईवर सहा विकेटने विजय
IPL 2022, LSG vs CSK : पहिल्या विजयासाठी लखनौ आणि चेन्नईचा संघ मैदानावर उतरणार आहेत. पहिल्या सामन्यात दोन्ही संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
LIVE
Background
IPL 2022, LSG vs CSK : आयपीएलच्या 15 व्या हंगमाताली पहिल्या विजयासाठी लखनौ आणि चेन्नईचा संघ मैदानावर उतरणार आहेत. यंदाच्या हंगमातील पहिल्या सामन्यात दोन्ही संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहेत. चेन्नई सुपरकिंग्सला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) तर लखनौला गुजरात टायटन्सने (GT) मात दिली आहे. चेन्नईचं रविंद्र जाडेजा तर लखनौचं के. एल. राहुल नेतृत्व करत आहे.
आयपीएलमध्ये गुरुवारी होणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स आणि लखनौ सुपरजायंट्स या दोन्ही संघाचा विचार करता दोघांकडे तगड्या खेळाडूंचा भरणा आहे. पण पहिल्या सामन्यात दोन्ही संघाचे काही खेळाडू अनुपस्थित असल्याने फटका बसला होता. दोन्ही संघात काही खेळाडू आले आहेत. त्यामुळे प्लेईंग 11 मध्येही बदल दिसण्याची शक्यता आहे.
कसा आहे लखनौ संघ ? -
केएल राहुल (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, जेसन होल्डर, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, आवेश खान, अंकित राजपूत, कृष्णप्पा गौतम, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मनन खान, आयुष बधोनी, काइल मायर्स, कर्ण शर्मा, एविन लुईस, मयंक यादव आणि बी साई सुदर्शन.
चेन्नई सुपर किंग्सचे शिलेदार -
रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी), रॉबिन उथाप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (14 कोटी), शिवम दुबे (4 कोटी), महिश तिक्षाना (70 लाख), सिमरनजीतसिंग (20 लाख), डेवॉन कॉनवे (1 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (50 लाख), मिचेल सॅन्टनर (1.90 कोटी), अडम मिल्न (1.90 कोटी), केएम आसिफ (20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख). शुभ्रांशु सेनापती (20 लाख), मुकेश चौधरी (20 लाख), प्रशांत सोळंकी (1.20 कोटी) ,ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी), एन जगदीशन (20 लाख), सी. हरी निशांत(20 लाख), भगत वर्मा(20 लाख), राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी)
IPL 2022, LSG vs CSK Match Live Updates : लखनौचा चेन्नईवर सहा विकेटने विजय
IPL 2022, LSG vs CSK Match Live Updates : कर्णधार के.एल राहुल आणि क्विंटन डिकॉक यांच्या तुफानी सलामीनंतर एविन लुईसच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या बळावर लखनौसंघाने 211 धावांचे आव्हान सहा गाडी राखून सहज पार केले. लखनौने 19.3 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा केल्या. लखनौकडून क्विंटन डिकॉकचे आणि लुईस यांनी अर्धशतकी खेळी केली. डिकॉकने 61 तर लुईसने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर राहुलने 40 धावांची छोटेखानी खेळी केली. आयपीएलच्या 15 व्या हंगामातील लखनौचा हा पहिला विजय आहे. लखनौला पहिल्या सामन्यात गुजरातकडून पराभव स्विकारावा लागला होता. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे.
IPL 2022, LSG vs CSK Match Live Updates : लुईसचं वादळ, 23 चेंडूत झळकावलं अर्धशतक
IPL 2022, LSG vs CSK Match Live Updates : लखनौच्या लुईसने वादळी अर्थशतकी खेळी करत संघाला विजयाकडे नेलं आहे. लुईसने अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. आयपीएल 15 मधील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. लखनौ सुपर जायंट्सला 6 चेंडूत 9 rpo प्रति ओवर सरासरी ने 9 धावांची गरज
IPL 2022, LSG vs CSK Match Live Updates : सामना रोमांचक स्थितीत
IPL 2022, LSG vs CSK Match Live Updates : लखनौ सुपर जायंट्सला 11 चेंडूत 15.27 rpo प्रति ओवर सरासरी ने 28 धावांची गरज
IPL 2022, LSG vs CSK Match Live Updates : ब्राव्हो आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज
🚨 𝕄𝕚𝕝𝕖𝕤𝕥𝕠𝕟𝕖 𝔸𝕝𝕖𝕣𝕥 🚨
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2022
1⃣7⃣1⃣ wickets & going strong! 👏 👏
Congratulations to @DJBravo47 - the leading wicket-taker in the history of the IPL. 🔝 🙌
Follow the match ▶️ https://t.co/uEhq27KiBB#TATAIPL | #LSGvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/VQUm6UskWz