(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LSG vs KKR, 1 Innings Highlight: लखनौचा डाव आटोपला, कोलकात्यासमोर 177 धावांचे लक्ष्य
IPL : आतापर्यंतच्या आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या लखनौचा कर्णधार शून्यावर बाद होऊनही संघाने 176 पर्यंत मजल मारली आहे.
LSG vs KKR : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या 53 व्या सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (LSG vs KKR) यांच्यात रंगला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौचा डाव नुकताच आटोपला आहे. त्यांनी 176 धावा केल्याने केकेआरसमोर 177 धावांचे आव्हान आहे. आजच्या सामन्यातही लखनौचा कर्णधार केएल राहुल शून्यावर बाद होऊनही पुढीळ फलंदाजांनी डाव सावरल्याने संघाने एक चांगल आव्हान केकेआरसमोर ठेवलं आहे. यावेळी डी कॉकचं अर्धशतक महत्त्वाचं ठरलं असून दीपक हुडा, स्टॉयनीस यांनीही चांगली फटकेबाजी केली आहे.
सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात डी कॉक आणि राहुलमधील ताळमेळ चुकल्याने राहुल एकही चेंडू न खेळता शून्यावर बाद झाला. पण डी कॉकने झुंज कायम ठेवत अर्धशतक झळकावलं. पण 50 धावा करुन तोही बाद झाला. त्यानंतर मात्र दीपक हुडाने 27 चेंडूत 41 धावांनी तुफान खेळी करत संघाची धावसंख्या वाढवण्यास मदत केली. कृणालने 25 धावांची मदत त्याला केली. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये स्टॉयनिसने तुफान खेळी करत षटकारांचा पाऊस पाडला. शिवम मावीच्या 19 व्या षटकाततर 5 षटकार पडले. यावेळी स्टॉयनिसने 3 तर होल्डरने एक विकेट घेतली. षटकातील एका चेंडूवर स्टॉयनिस बादही झाला.
साऊदीची उत्कृष्ट ओव्हर
19 व्या षटकात 5 षटकार खाल्यानंतर केकेआर संघाची 20 वी ओव्हर कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यावेळी अनुभवी टीम साऊदीने उत्तम अशी ओव्हर टाकत केवळ 4 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याच्या या दमदार षटकामुळेच लखनौचा संघ 176 धावाच करु शकला. ज्यामुळे आता केकेआरला विजयासाठी 177 धावा करायच्या आहेत.
हे देखील वाचा-