IPL 2022: 'या' भारतीय गोलंदाजांनी जिंकलीय पर्पल कॅप, एकानं सलग दोनदा मारली बाजी
Indian bowlers who have won Purple Cap: आयपीएलमधील प्रत्येक संघाचं यश नेहमीच त्यांच्या संघातील भारतीय वेगवान गोलंदाज कशी गोलंदाजी करतात यावर अवलंबून असते.
Indian bowlers who have won Purple Cap: आयपीएलमधील प्रत्येक संघाचं यश नेहमीच त्यांच्या संघातील भारतीय वेगवान गोलंदाज कशी गोलंदाजी करतात यावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत, आयपीएलच्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणार्या आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या भारतीय गोलंदाजांबद्दल जाणून घेऊया. या यादीतील एका गोलंदाजानं सलग दोनदा पर्पल कॅप जिंकलीय.
आर.पी. सिंह
भारताचा माजी वेगावान गोलंदाज आणि टी-20 विश्वषचक 2007 चा हिरो आरपी सिंहनं आयपीएलची सर्वात प्रथम पर्पल कॅप जिंकली होती. आयपीएल 2009 डेकन चार्जर्सकडून खेळताना त्यानं 16 सामन्यात 23 विकेट घेतले आहेत. आरपी सिंह हा पर्पल कॅप जिंकणारा पहिला भारतीय गोलंदाज आहे. या हंगामात डेक्कन चार्जर्सनं पहिल्यांदाच आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.
प्रज्ञान ओझा
भारताकडून पर्पल कॅप मिळवणारा गोलंदाजाच्या यादीत प्रग्यान ओझा दुसरा गोलंदाज होता. आयपीएल 2010 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना त्यानं या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेतल्या. या हंगामात त्यानं 16 सामन्यात 21 विकेट घेतल्या होत्या.
मोहित शर्मा
आयपीएल 2014 मध्ये मोहित शर्मानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सर्वांना प्रभावित केलं होते. या हंगामात त्यानं 16 सामन्यात 23 विकेट्स घेऊन पर्पल कॅप जिकंली होती.
भुवनेश्वर कुमार
या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचं नाव आहे. त्यानं आयपीएलमध्ये सलग दोनदा पर्पल कॅप जिंकली होती. त्यानं 2016 मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना 17 सामन्यात 23 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच 2017 मध्ये त्यानं 14 सामने खेळून 26 विकेट्स घेतल्या.
हर्षल पटेल
आयपीएलच्या मागच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाकडून खेळताना हर्षल पटेलनं दमदार गोलंदाजी केली होती. त्यानं 15 सामन्यात 32 विकेट्स घेतल्या होत्या. आतापर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजाला आयपीएलमध्ये 32 विकेट्स घेता आले नाहीत.
हे देखील वाचा-