MI vs KKR Playing 11: 'या' खेळाडूंना करा तुमच्या संघात सामील, लाखो रुपये कमवून देण्याची शक्यता
MI vs KKR Playing 11: आयपीएलचा पंधरावा हंगाम अंतिम टप्प्यावर पोहचला आहे.
MI vs KKR Playing 11: आयपीएलचा पंधरावा हंगाम अंतिम टप्प्यावर पोहचला आहे. दरम्यान, प्रत्येक संघानं 14 पैकी 10 सामने खेळले आहेत. आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचं स्थान निश्चित झालं आहे. दरम्यान, प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबईचा संघ बाहेर पडलाय. परंतु, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी सात संघांमध्ये लढाई सुरू आहे. या यादीत कोलाकाता नाईट रायडर्सदेखील आहे. आज कोलकातच्या संघ मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.
मुंबई इंडियन्सनं या स्पर्धेत आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामने जिंकले आहे. तर, आठ सामने गमावले आहेत. मुंबईचे फक्त चार गुण आहेत. दुसरीकडं कोलकाता नाईट रायडर्सनं आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी चार जिंकले आहेत आणि सात सामन्यात पराभव स्वीकारला आहे. कोलकात्याचा संघ आठ गुणांसह 9व्या स्थानावर आहे. प्लेऑफची आशा जिवंत ठेवण्यासाठी कोलकात्याला उर्वरित तीन सामने जिंकावे लागणार आहेत. एवढेच नव्हेतर या तिन्ही सामन्यात कोलकात्याला मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागणार आहे.
मुंबई विरुद्ध कोलकाता अशी असेल ड्रीम 11 (MI vs KKR Best Dream 11)
विकेटकिपर- ईशान किशन.
फलंदाज- श्रेयस अय्यर (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिळक वर्मा, नितिश राणा.
अष्टपैलू खेळाडू- आंद्रे रसल (कर्णधार), सुनील नारायण.
गोलंदाज- टीम साऊथी, मुरगन अश्विन, जसप्रीत बुमराह.
पिच रिपोर्ट
मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मोठी धावसंख्या करण्यात आली आहे. या मैदानावर अखेरचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघानं 208 धावा केल्या होत्या. प्रत्त्युरात दिल्लीच्या संघ 117 धावाचं करू शकला. या मैदानावर आतापर्यंत 16 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 9 सामन्यांत लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे.या पिचवर या विकेटवर प्रथम फलंदाजी करणे देखील वाईट नाही. रात्रीच्या लढतीमुळं दवाचा प्रभाव राहील. अशा स्थितीत नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
हे देखील वाचा-