Umran Malik : 'श्रीनगर एक्सप्रेस' उम्रान मलिकची वेगवान कामगिरी; अखेरच्या षटकात एकही धाव न देता तिघांना धाडलं माघारी
IPL 2022, PBKS vs SRH: पंजाब संघाचा डाव 151 धावांवर आटोपला असून त्यांना या धावसंख्येत रोखण्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे.
![Umran Malik : 'श्रीनगर एक्सप्रेस' उम्रान मलिकची वेगवान कामगिरी; अखेरच्या षटकात एकही धाव न देता तिघांना धाडलं माघारी IPL 2022 In SRH vs PBKS match Bowler Umran Malik took Four wickets bowled maiden over with three wickets in an over Umran Malik : 'श्रीनगर एक्सप्रेस' उम्रान मलिकची वेगवान कामगिरी; अखेरच्या षटकात एकही धाव न देता तिघांना धाडलं माघारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/17/dcbb96068f8dd86c7160fe6f0f2d5331_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PBKS vs SRH : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या 28 व्या सामन्यात हैदराबादचा युवा गोलंदाज उम्रान मलिकच्या (Umran Malik) वेगाने पंजाबच्या फलंदाजांना पछाडलं. त्याने सामन्यात चार षटकात 28 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने सामन्यातील आणि त्याच्या चार ओव्हरमधील अखेरची ओव्हर टाकताना एकही धाव न देता तीन फलंदाजांना तंबूत धाडलं. त्याच्या या कामगिरीमुळे हैदराबाद संघाला चांगलाच फायदा झाला.
उम्रानने सामन्यात सर्वात आधी जितेश शर्माचा महत्त्वाचा विकेट घेतला. त्याने तीन षटकात 28 धावा देत एक विकेट घेतली होती. त्यामुळे अखेरची आणि महत्त्वाची ओव्हर त्याला देण्यात आली. ज्यात त्याने ओडियन स्मिथ (13), वैभव अरोरा आणि राहुल चाहर या दोघांना शून्यावर बाद करत तंबूत धाडलं. तर अखेरच्या चेंडूवर देखील अर्शदीप सिंहला धावचीत केलं. अशाप्रकारे अखेरच्या षटकात एकही धाव न देता तीन विकेट्स घेतल्या.
अशी झाली पहिली इनिंग
मन्यात नाणेफेकीनंतर सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या गोलंदाजांनी हा निर्णय अगदी चोख असल्याचं दाखवत पंजाबला मोठी धावसंख्या उभी करु दिली नाही. पंजाबचा लियाम सोडता सर्व खेळाडू खराब कामगिरी करु शकल्याने पंजाबने 151 धावा केल्या असून हैदराबादला विजयासाठी 152 धावा करायच्या आहेत. सामन्यात सुरुवातीलाच पंजाबचे सलामीवीर शिखर (8) आणि प्रभसिमरन (14) स्वस्तात माघारी परतले. जॉनी देखील 12 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर लियामने दमदार खेळी करत 60 धावांची महत्तपूर्ण खेळी केली. शाहरुख खानने 26 धावांची साथ त्याला दिल्यामुळे संघाने दीडशे धावांपर्यंत मजल मारली.
20 वी ओव्हर मेडन टाकणारे गोलंदाज
आयपीएलमध्ये 20 वी ओव्हर म्हणजे अगदी दमदार हिटींग दिसून येते. पण ही महत्त्वाची ओव्हरही मेडन अर्थात निर्धाव टाकणारे चार खेळाडू आहे. यातील एक नाव म्हणजे आज मेडन ओव्हर टाकणारा उम्रान मलिक आहे. त्याआधी 2008 मध्ये इरफान पठाण, 2009 मध्ये लसिथ मलिंगा आणि 2017 मध्ये जयदेव उनाडकटने ही कामगिरी केली आहे.
हे देखील वाचा-
- PBKS vs SRH, Match Highlights: लियाम लिव्हिंगस्टोनची एकाकी झुंज; हैदराबादसमोर 152 धावांचे आव्हान
- MI vs LSG, Top 10 Key Points : मुंबईचा पराभवांचा 'षटकार', लखनौचा 18 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- DC vs RCB : कार्तिक-मॅक्सवेलची फटकेबाजी, हेजलवूडचा भेदक मारा, आरसीबीचा दिल्लीवर विजय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)