IPL 2022, GT vs PBKS, Probable 11 : हार्दिकच्या टोळीसमोर मयांकची फौज, कशी असू शकते अंतिम 11
IPL 2022 : गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स या दोघांमध्ये नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात सामना होणार आहे.
GT vs PBKS : आज यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) दमदार कामगिरी करणारा गुजरात टायटन्सचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यांच्यासमोर आव्हान पंजाब किंग्स (Gujrat Titans vs Punjab Kings) संघाचे असेल. गुणतालिकेचा विचार करता गुजरातने आतापर्यंत 9 पैकी 8 सामने जिंकत सर्वात वर स्थान मिळवलं आहे. दुसरीकडे पंजाब संघाने 9 पैकी 4 सामने जिंकल्याने ते गुणतालिकेत खालच्या स्थानांमध्ये आहेत.
गुजरात संघाची आतापर्यंतची कामगिरी अप्रतिम आहे. त्याचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित झालं आहे, पण पंजाबचं आव्हान मात्र त्यांच्यासमोर आहेच. त्यात आजचा सामना होणाऱ्या नवी मुंबईतील डी.वाय.पाटील मैदानात (D.Y. Patil Stadium) गोलंदाजासह फलंदाज अशा दोघांना समसमान संधी असल्याने सामने चुरशीचे होताना दिसतात. मोठी धावसंख्या उभा राहत नसली तरी सामने अटीतटीचे होताना दिसतात. त्यात आजचा सामना सायंकाळी असल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण होऊ शकते. दरम्यान दोन्ही संघाकडून नक्की कोणते खेळाडू मैदानात उतरतील हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. पण तरी आतापर्यंतच्या खेळीच्या जोरावर कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल यावर एक नजर फिरवूया...
गुजरात संभाव्य अंतिम 11
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल, मोहम्मद शमी
पंजाब संभाव्य अंतिम 11
मयांक अग्रवाल (कर्णधार),शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेयस्टो, जितेश शर्मा, ऋशी धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, संदीप शर्मा
हे देखील वाचा-
- Kohli and Ronaldo : विराट कोहलीची तुलना ख्रिस्तियानो रोनाल्डोशी, केविन पीटरसन म्हणला...
- Prithvi Shaw violates code of conduct: दिल्लीच्या पृथ्वी शॉ ला 25 टक्क्यांचा दंड, आचारसंहितेचा भंग केल्यामुळं कारवाई
- IPL 2022: आयपीएलमध्ये सर्वात मोठ्या भागीदाराचा विक्रम कोणत्या जोडीच्या नावावर? ऋतुराज- कॉन्वेचा यादीत समावेश
- LSG vs DC: दिल्लीविरुद्ध लाईव्ह सामन्यात गौतम गंभीरची शिवीगाळ, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल