(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022: आयपीएलमध्ये सर्वात मोठ्या भागीदाराचा विक्रम कोणत्या जोडीच्या नावावर? ऋतुराज- कॉन्वेचा यादीत समावेश
SRH Vs CSK, IPL 2022: हैदराबादला 13 धावांनी पराभूत करून चेन्नईच्या संघानं या हंगामातील तिसरा विजय मिळवला आहे.
SRH Vs CSK, IPL 2022: सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्ज (Sunrisers Hyderabad Vs Chennai Super Kings) यांच्यात पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium) काल आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 46 वा सामना खेळण्यात आला. या सामन्यात चेन्नईच्या संघानं हैदराबादला 13 धावांनी पराभूत करून या हंगामातील तिसरा विजय मिळवला. चेन्नईच्या विजयात सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेव्हॉन कॉन्वेनं (Devon Conway) महत्वाची भूमिका बजावली. यादरम्यान दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी झाली.
राजस्थानविरुद्ध सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वेनं यांच्यात मोठी भागीदारी. दरम्यान, ऋतुराज गायकवाडचं केवळ एका धावानं शतक हुकलं. तर, डेव्हॉन कॉन्वेनं 85 धावांची आक्रमक खेळी केली. या दोन खेळाडूंच्या भागीदारीने विक्रम केला. आयपीएलमधील सर्वात मोठी भागीदारी करणाऱ्या जोडींच्या यादीत चौथ्या स्थानावर आहेत.
ऋतुराज गायकवाडचं शतक हुकलं
राजस्थानविरुद्ध सामन्यात ऋतुराज गायकवाडआणि डेवॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारी केली. चेन्नई सुपर किंग्जसाठी एखाद्या जोडीने केलेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. ही भागीदारी अजून मोठी होऊ शकत होती. परंतु, ऋतुराज गायकवाड 99 धावांवर बाद झाला आणि त्यांची भागेदारी तुटली.
आयपीएलमधील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम
आयपीएलमधील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर आहे. आयपीएलच्या बाराव्या हंगामात दोघांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 185 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर गौतम गंभीर आणि ख्रिस लिन यांच्यातील 184 धावांची भागीदारी दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही खेळाडूंनी आयपीएल 2017 मध्ये ही भागीदारी केली होती. आयपीएलच्या तेराव्या हंगामात केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी 183 धावांची भागीदारी केली होती. यानंतर ऋतुराज आणि कॉन्वेचा क्रमांक लागतो.
हे देखील वाचा-