(Source: Poll of Polls)
BCCI चा मोठा निर्णय, IPL फायनलची वेळ बदलली, पाहा किती वाजता सुरु होणार महामुकाबला?
IPL 2022 final Mmatch Timing : आयपीएलचा 15 वा हंगाम अखेरच्या टप्यात आहे. 22 मे रोजी अखेरचा लीग सामना होणार आहे.
IPL 2022 final Mmatch Timing : आयपीएलचा 15 वा हंगाम अखेरच्या टप्यात आहे. 22 मे रोजी अखेरचा लीग सामना होणार आहे. त्यानंतर प्लेऑफ आणि फायनलचा रनसंग्राम होणार आहे. 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये आयपीएलचा फायनल मुकाबला होणार आहे. इतर सामन्यांच्या तुलनेत हा महामुकाबला अर्धा तास उशीरा सुरु होणार आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार, रात्री 8 वाजता अंतिम सामना होणार आहे. साडेसात वाजता नाणेफेक होईल... सध्या साडेसात वाजता आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होते, तर सात वाजता नाणेफेक होतो. तर दुपारचा सामना साडेतीन वाजता सुरु होतो अन् तीन वाजता नाणेफेक होते..
दिमाखात समारोप -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या फायनल सामन्यापूर्वी समारोप कार्यक्रम आयोजत करण्यात येणार आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. आयपीएलचा क्लोजिंग समारोप 29 मे रोजी सायंकाळी साडेसाहा वाजता सुरु होणार आहे. हा कार्यक्रम 50 मिनिटांपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला नव्हता... पण आज झालेल्या बैठकीत समारोप कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
पुढील हंगामापासून वेळेत बदल -
बुधवारी बीसीसीआयने आयपीएल 2023 बाबात मोठी घोषणा केली होती. क्रिकबजच्या रिपोर्ट्सनुसार, संभावित ब्रॉडकास्टरला सामना सायंकाळी आठ वाजता सुरु होणार असल्याचे सांगितलेय. तर दुपारचा सामना सांयकाळी चार वाजता सुरु होणार असल्याचे सांगण्यात आलेय. तसेच 16 व्या हंगामात डबल हेडर सामने कमी असतील, याचा विचार करण्यात येणार आहे.
प्लेऑफ आणि अंतिम सामन्यासाठी संघ कसे पात्र ठरतील?
गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिल्या दोन संघामध्ये क्वालिफायर - 1 चा (Qualifier 1) सामना होणार आहे. यातून विजेता संघ अंतिम फेरीत धडक मारणार आहे. तर पराभूत संघांचा सामना क्वालिफायर 2 मध्ये होईल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघामध्ये एलिमिनेटर 1 (Eliminator 1) मध्ये सामना होणार आहे. यातून विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये जाईल. क्वालिफायर - 1 मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटर 1 मधील विजेत्या संघामध्ये क्वालिफायर 2 मध्ये सामना होणार आहे. यामधील विजेता संघ अंतिम फेरीत धडक मारेल.
क्वालिफायर 1- 24 मे - कोलकाता
एलिमिनेटर: 25 मे - कोलकाता
क्वालिफायर 2 - 27 मे - अहमदाबाद
फायनल: 29 मे - अहमदाबाद