![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jos Buttler Record : बटलरने टाकलं वॉर्नरला मागे, हंगामाच्या अखेरच्या सामन्यातही कमाल
GT vs RR : आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडत असून या सामन्यात जोस बटलरने एका रेकॉर्डमध्ये वॉर्नरला मागे टाकलं आहे.
![Jos Buttler Record : बटलरने टाकलं वॉर्नरला मागे, हंगामाच्या अखेरच्या सामन्यातही कमाल IPL 2022 Final GT vs RR Jos Buttler hits 863 runs breaks warner record of most runs in single ipl season 848 runs Jos Buttler Record : बटलरने टाकलं वॉर्नरला मागे, हंगामाच्या अखेरच्या सामन्यातही कमाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/30/5f39128b3638f8986183578d7d6766be_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2022 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) आज आयपीएल 2022 स्पर्धेचा (IPL 2022) अंतिम सामना (IPL 2022 Final) खेळवला जात आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) हे दोन्ही संघ आमने-सामने खेळत असून राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली आहे. दरम्यान यावेळी सलामीवीर जोसने 39 धावांची खेळी केली, पण या छोट्या खेळीतही त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. जोसने एका हंगामात सर्वाधिक धावा करण्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डेव्हिड वॉर्नरला मागे टाकलं आहे. जोसने 39 धावांसह 863 रन पूर्ण केले आहेत. त्याने 2016 साली 848 धावा केलेल्या वॉर्नरला मागे टाकलं आहे.
यंदाच्या हंगामात बटलरने अगदी तुफान फटकेबाजी करत आयपीएल 2022 मध्ये 17 सामन्यात 57.53 च्या सरासरीने 149.05 च्या स्ट्राईक रेटने 863 रन केले आहेत. आजच्या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर 824 रन होते त्यामुळे केवळ 25 रन करुन तो वॉर्नरचा 848 धावांचा रेकॉर्ड तोडू शकत होता. पण त्याने 39 धावा केल्यामुळे 863 रन नावे केल्यामुळे तो यादीत वॉर्नरच्या पुढे गेला आहे. वॉर्नरने आयपीएल 2016 मध्ये 848 रन केले होते. तर त्याच वर्षी विराट कोहलीने (Virat Kohli) 973 रन केले होते. दरम्यान विराटला मात्र बटलरला मागे टाकता आलेलं नाही.
एका आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- विराट कोहली- 973
- जोस बटलर- 863
- डेव्हिड वॉर्नर- 848
हे देखील वाचा-
- Lockie Ferguson Ipl Record : वेगवान लॉकी! गुजरातच्या फर्ग्यूसनने 157.3 Kmph वेगाचा चेंडू फेकत आयपीएल रेकॉर्डशी केली बरोबरी
- GT vs RR, Toss Update : महामुकाबल्यात राजस्थानने घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय, मोठी धावसंख्या करण्याचा निर्धार, पाहा दोघांची अंतिम 11
- IPL 2022 Final : वंदे मातरम्! अंगावर शहारा आणणारा एआर रहमानचा परफॉर्मन्स, पाहा VIDEO
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)