एक्स्प्लोर

IPL 2022 Final GT vs RR : हार्दिकच्या टोळीची भेदक गोलंदाजी, राजस्थानच्या फलंदाजांची तारांबळ, गुजरातसमोर 131 धावांचे माफक आव्हान

IPL 2022 Final : आयपीएलच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी निवडली, पण त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी खास ठरला नसल्याचं दिसून येत आहे. संपूर्ण संघाने मिळून केवळ 130 धावाच केल्या आहेत.

RR vs GT, IPL 2022 Final : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) खेळवला जात असून राजस्थानची फलंदाजी नुकतीच आटोपली आहे. राजस्थानने 20 षटकात 9 गडी गमावत 130 धावाच केल्याने गुजरातला आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी 120 चेंडूत 131 धावा करायच्या आहे. इनिंगमध्ये बटलरने सर्वाधिक 39 धावा केल्या असून हार्दिकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत. 

राजस्थानची फलंदाजी फेल

नाणेफेक जिंकत राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. एक मोठी धावसंख्या करुन गुजरातवर दबाव टाकण्याचा निर्धार राजस्थानने केला असावा, पण गुजरातच्या भेदक गोलंदाजीमुळे राजस्थानचा हा निर्णय़ पुरता फसला. संघाची ठिक-ठाक झालेली सुरुवात नंतर मात्र संपूर्णपणे ढासळली. सलामीवीर यशस्वी आणि बटलर क्रिजवर असताना एक मोठी धावसंख्या होईल असं वाटतं होतं. यशस्वी फटकेबाजी देखील करत होता. पण 22 धावा करुन तो बाद झाल्यानंतर मात्र राजस्थानचा डाव धीमा झाला. यशने ही विकेट घेतली होती. त्यानंतर कर्णधार संजू बटलर सोबत डाव सांभाळत असतानाच गुजरातचा कर्णधार हार्दिकने संजूला बाद केलं. ज्यानंतर काही वेळातच पडिक्कलही बाद झाला. पण बटलर क्रिजवर असल्यामुळे सर्वांना आशा होती, पण पांड्याने आणखी एक दमदार चेंडूवर बटलरलाही तंबूत धाडलं. ज्यानंतर मात्र एकाही फलंदाजाला टिकून खेळता आलं नाही. बटलरच्या 39 धावा सर्वाधिक राहिल्या. हिटमायर आणि बोल्ट यांनी प्रत्येकी 11 तर रियानने 15 धावांची खेळी केली. संपूर्ण संघ मिळून केवळ 130 धावाच करु शकला आहे.

गोलंदाजीत हार्दिक ठरला कॅप्टन कमाल

गुजरात संघाच्या सर्वच खेळाडूंनी कमाल गोलंदाजी केली. पण कर्णधार हार्दिक पांड्याने मात्र सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण तीन विकेट्स घेतल्या. पांड्याने 4 षटकात 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यात संजू, बटलर आणि हेटमायर या महत्त्वाच्या विकेट्स होत्या. साईकिशोरने दोन तर यश दयाल, राशिद खान आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Embed widget