(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022: दिल्लीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, पृथ्वी शॉला रुग्णालयातून डिस्चार्ज
IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) युवा फलंदाज पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) टायफॉइडमधून बरा झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) युवा फलंदाज पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) टायफॉइडमधून बरा झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्लीच्या संघानं ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. दिल्लीच्या दोन उर्वरित सामन्यात पृथ्वी शॉ डेव्हिड वार्नरसोबत सलामीला येणार की नाही? याबाबात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
दिल्ली कॅपिटल्सच्या निवेदनात काय म्हटलंय?
"दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, जिथे त्याच्यावर टायफॉइडवर उपचार सुरू होते. शॉ हॉटेलमध्ये परतला आहे, जिथे तो वैद्यकीय देखरेखीखाली आहे", असं दिल्लीच्या संघानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. महत्वाचं म्हणजे, पृथ्वी शॉ दिल्लीच्या उर्वरित सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे, असं दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन यांनी सूचित केलं होतं.
पृथ्वी शॉची कामगिरी
पृथ्वी शॉनं 1 मे रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध त्याचा अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर दिल्लीच्या संघाला सनरायजर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यातून त्याला वगळण्यात आलं होतं. शॉनं 8 मे रोजी इंस्टाग्राम स्टोरीमध्ये त्याला तापामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती. यंदाच्या हंगामात पृथ्वी शॉनं नऊ सामन्यात 28.78 च्या सरासरीनं आणि 159.87 च्या स्ट्राइक रेटनं 259 धावा केल्या आहेत. ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
अखेरच्या दोन सामन्यात दिल्लीचा संघ कोणाशी भिडणार?
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स सोमवारी पंजाब किंग्जशी भिडणार आहे. त्यानंतर 21 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध आयपीएल 2022 मधील त्यांचा शेवटचा सामना खेळणार आहे. सध्या दिल्लीचे 12 गुण आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दिल्लीच्या संघाला त्यांच्या उर्वरित दोन्ही सामन्यात मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-