एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

धोनीनं सामना फिरवला, मुंबईचा पराभव, चेन्नईचा तीन विकेटनं विजय

एमएस धोनीने आपल्या स्टाईलनं फटकेबाजी करत रोमांचक सामना चेन्नईच्या बाजूने फिरवला. धोनीच्या फिनिशिंग टचच्या जोरावर चेन्नईने मुंबईचा तीन गड्यांनी पराभव केला

IPL 2022, MI vs CSK: एमएस धोनीने आपल्या स्टाईलनं फटकेबाजी करत रोमांचक सामना चेन्नईच्या बाजूने फिरवला. धोनीच्या फिनिशिंग टचच्या जोरावर चेन्नईने मुंबईचा तीन गड्यांनी पराभव केला. मुंबईने दिलेले 156 धावांचे आव्हान चेन्नईने सात गड्यांच्या मोबदल्यात पार केले. धोनीच्या फटकेबाजीमुळे डॅनिअल सॅम्सची भेदक गोलंदाजी वाया गेली. 

मुंबईने दिलेले 156 धावांचे आव्हानांचा सामना करताना चेन्नईची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड एकही धाव न काढता तंबूत परतला. त्यानंतर मिचेल सँटनरही बाद झाला. सँटनरने 11 धावा काढल्या. त्यानंतर रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडू या अनुभवी खेळाडूंनी संयमी फलंदाजी करत सामना चेन्नईच्या बाजूने झुकवला. पण उथप्पाला बाद करत उनाडकदने सामना रंगतदार केला. उथप्पा 30 धावा काढून बाद झाला. त्यापाठोपाठ शिवम दुबे 13, जाडेजा 3 आणि अंबाती रायडू 40 धावा काढून बाद झाले. त्यामुळे सामना पुन्हा एकदा मुंबईच्या बाजूने झुकला होता. पण धोनी आणि प्रिटोरिस यांनी संयमी फलंदाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली. प्रिटोरिसने 14 चेंडूत 22 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकत 17 धावांची गरज असताना प्रिटोरिस  बाद झाला. पण धोनीने आपल्या स्टाईलने सामना संपवला. धोनीने 13 चेंडूत 28 धावांची खेळी केली. 

डॅनिअल सॅम्सने भेदक मारा करत चार विकेट घेतल्या. सॅम्सच्या भेदक माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज चाचपडताना दिसले. डॅनिअल सॅम्सने ऋतुराज गायकवाड, मिचेल सँटनेर, अंबाती रायडू आणि शिवम दुबेला बाद केले. रायली मेरिडेथला एक विकेट मिळाली. तर जयदेव उनाडकदला दोन विकेट मिळाल्या. जयदेवनं चार षटकात 48 धावा खर्च केल्या. जयदेवच्या अखेरच्या दोन षटकात सामना चेन्नईच्या बाजूने झुकला.

दरम्यान, तिलक वर्माच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत सात बाद 155 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईच्या फलंदाजांची तारांबळ उडाली होती. मुंबईने 50 धावांच्या आत आघाडीचे चार फलंदाज गमावले होते. पण तिलक वर्माने केलेल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने सन्माजनक धावसंख्या उभारली.  

नाणेफेकीचा कौल चेन्नईच्या बाजूने - 
डी वाय पाटील स्टेडिअममध्ये सुरु असलेल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल चैन्नईच्या बाजूने लागला. चेन्नईचा कर्णधार रविंद्र जाडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

चेन्नईचा भेदक मारा - 
कर्णधार रविंद्र जाडेजाने घेतलेला निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक ठरवला. पहिल्यापासूनच चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांनर दबाव निर्माण केला. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर मिचेल सँटरनेर, महिश तिक्षणा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. तर ब्राव्होने मुंबईच्या दोन फलंदाजांना बाद केले. 

मुकेश चौधरीचा भेदक मारा -
वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने भेदक मारा करत मुंबईच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. मुकेश चौधरीच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईची आघाडीची फळी ढेफाळली. मुकेश चौधरीने पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला बाद करत मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर ईशान किशन आणि डेवॉल्ड ब्रेविसला बाद करत मुंबईची आघाडी फळी उद्धवस्थ केली. मुकेश चौधरीने तीन षटकात 19 धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले. मुकेश चौधरीने तीन षटकात तब्बल 12 चेंडू निर्धाव फेकले. मुकेशच्या गोलंदाजीपुढे मुंबईची फलंदाजी कमकुवत वाटत होती. 

मुंबईच्या फलंदाजांचं लोटांगण - 
चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईच्या फंलदाजांनी लोटांगण घेतलं. पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. त्याच्यापाठोपाठ ईशान किशनही तंबूत परतला. दोन धावांवर मुंबईचे दोन गडी बाद झाले होते. त्यानंतर डेवॉल्ड ब्रेविसही (4) बाद झाला.  सूर्यकुमार यादवने थोडाफार प्रतिकार केला. पण 32 धावांवर सूर्यकुमार यादवचा सँटनरने अडथळा दूर केला. पदार्पण करणाऱ्या ह्तिक शॉकिन याने 25 धावांची खेळी केली. पोलार्डला 14 धावांवर तिक्षणाने तंबूत धाडले.  डॅनिअल सॅम्सलाही (5) मोठी खेळी करण्यात अपयश आले. उनाडकदने 19 धावांची विस्फोटक खेळी करत संघाची धावसंख्या 150 पार पोहचवली. 

तिलक वर्माची एकाकी झुंज - 
मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्माने एका बाजूने संयमी फलंदाजी केली. एका बाजूला विकेट पडत असताना तिलक वर्माने आपला संयम सोडला नाही. तिलक वर्माने 43 चेंडूत संयमी 51 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीदरम्यान तिलक वर्माने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. 

दोन्ही संघात बदल
नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडिअममध्ये सुरु असलेल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार रविंद्र जाडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. महत्वाच्या सामन्यात मुंबईच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. मुंबईने रायली मेरीडेथ, ह्रतिक शॉकिन आणि डॅनिअल सॅम यांना संघात संधी दिली आहे. रॅली मेरीडेथ हा वेगवान गोलंदाज आहे. तर ह्रतिक शॉकिन हा फिरकी गोलंदाज आहे. चेन्नईच्या संघातील डाव्या हाताचे फलंदाज असल्यामुळे मुंबईने शॉकिनला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाच्या सामन्यात चेन्नईने आपल्या संघात दोन मोठे बदल केले आहेत. चेन्नईने मोईन अली आणि ख्रिस जॉर्नला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्याजागी  ड्वेन प्रिटोरियस आणि मिचेल सँटनेरला संधी देण्यात आली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Full PC : सरकारने बेईमानी केली तर त्यांना गुडघ्यावर आणू - मनोज जरांगेAmol Mitkari Full PC : जयंत पाटलांबाबत वाईट वाटतं; प्रमाणपत्र घ्यायलाही गेले नाहीत - अमोल मिटकरीSunil Tatkare On Ajit Pawar : अजित पर्वावर जनतेचं शिक्कामोर्तब  - सुनिल तटकरेSanjay Raut Full PC : महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्येच शपथविधी घ्यावा - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Embed widget