CSK vs RCB : चेन्नईची विजयाची प्रतिक्षा संपणार का?, समोर बंगळुरुचं तगडं आव्हान, कशी असेल रणनीती?
आयपीएलमधील बलाढ्य संघ चेन्नई सुपरकिंग्स यंदा मात्र अत्यंत खराब कामगिरी करताना दिसत आहे. त्यांनी चार पैकी चार सामने गमावले आहेत.
CSK vs RCB : आयपीएलमधील (IPL 2022) आजचा सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (CSK vs RCB) या दोन दमदार संघात पार पडत आहे. दोन्ही संघाचे याआधीचे सामनेही चुरशीचे झाले आहेत. पण बहुतेक वेळा चेन्नईचं पारडं जड असल्याचं दिसून आलं आहे. पण यंदाच्या हंगामात चेन्नईला चार पैकी चार सामने गमवावे लागले असल्याने त्यांचा फॉर्म खराब आहे. दुसरीकडे आरसीबी मात्र कमाल फॉर्ममध्ये असून त्यांनी चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज चेन्नई विजयाचं खातं उघडणार की बंगळुरु त्यांची विजयी मालिका कायम ठेवणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आजचा सामना पार पडणाऱ्या नवी मुंबईतील डी.वाय.पाटील मैदानात (DY Patil Stadium) आजही नाणेफेक जिंकणारा सामना नक्कीच गोलंदाजी निवडेल. कारण सामना सायंकाळी असल्याने दवाची अडचण होण्याची दाट शक्यता आहे. त्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यात संघाकडून चांगला स्कोर होताना पाहायाला मिळत आहे. अगदी मोठा नाही तर अगदी कमीही नाही, आव्हानात्मक स्कोर उभा होत असल्याने सामने चुरशीचे होत आहेत. त्यात आजचा सामना असणारे दोन्ही संघ दमदार असल्याने आजचा सामना क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणी असेल.
बंगळुरु संभाव्य अंतिम 11
अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, डेविड विली, वानिंदू हसरंगा, सिद्धार्थ कौल, आकाश दीप, मोहम्मद सिराज
चेन्नई संभाव्य अंतिम 11
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, एम.एस. धोनी (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, मुकेश चौधरी, अॅडम मिल्ने
महत्त्वाच्या इतर बातम्या
SRH vs GT : हैदराबादच्या नवाबांचा विजय, गुजरातचा पहिला पराभव