CSK vs PBKS : चेन्नई विरुद्ध पंजाब लढल, कशी असेल प्लेइंग इलेव्हन? जाणून घ्या...
CSK vs PBKS : आयपीएलच्या इतिहासात चेन्नई आणि पंजाब यांच्यात 26 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये चेन्नईने 16 आणि पंजाबने 10 सामने जिंकले आहेत.
CSK vs PBKS : आयपीएलचा आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात चेन्नईसमोर आयपीएलच्या पंधराव्या मोसमात पहिला विजय मिळवायचं लक्ष्य असेल. तर पंजाबलाही पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतण्याची संधी आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चेन्नई आणि पंजाब यांच्यात 26 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये चेन्नईने 16 आणि पंजाबने 10 सामने जिंकले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या सामन्यात कोणता संघ प्रबळ आहे.
चेन्नईकडे पहिला विजय मिळवण्याचं लक्ष्य
रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला आपली जुनी जादू कायम ठेवता आलेली नाही. चेन्नईच्या संघाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चेन्नईचा संघ ज्या दमदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो तसा गोलंदाजीत दमदारपणा अद्याप पाहायला मिळालेला नाही. अशा परिस्थितीत जडेजा आणि धोनीला पुन्हा एकदा संघाच्या रणनीतीचा विचार करावा लागणार आहे.
पंजाबसाठी 'गुड न्यूज'
या सामन्यापूर्वी पंजाबसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉनी बेअरस्टो संघात सामील झाला आहे. तो चेन्नईविरुद्धही मैदानात उतरण्याची शकता आहे. पंजाबसाठी सर्वात मोठी समस्या त्यांची गोलंदाजी आहे. युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि ऑफस्पिनर हरप्रीत ब्रार यांना काही विशेष साध्य करता आलेले नाही. अशा स्थितीत संघालाही त्यांचे पर्याय शोधावे लागतील.
येथे पाहा सामना :
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्ही सामना पाहू शकता. याशिवाय लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवरही सामना पाहू शकता.
खेळपट्टी
आयपीएलमधील आतापर्यंत दोन सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाले आहेत. या दरम्यान, उच्च स्कोअरिंग सामने पाहिले गेले आहेत. रात्रीच्या सामन्यात दव महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दव असल्याने गोलंदाजांना चेंडू पकडणे कठीण होत आहे. अशा स्थितीत नाणेफेक जिंकून गोलंदाजी करणे कर्णधाराला अधिक योग्य वाटेल.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी (WK), रवींद्र जडेजा (कॅप्टन), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन प्रिटोरियस, ख्रिस जॉर्डन आणि राजवर्धन हंगरगेकर.
पंजाब किंग्ज संभाव्य प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे (WK), ओडियन स्मिथ, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चहर.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- मानवांची नग्न छायाचित्रे अंतराळात पाठवणार, एलियन्सना आकर्षित करण्यासाठी शास्त्रज्ञांची कल्पना
- Viral Video : शेजाऱ्यांकडून खाऊ मिळण्यासाठी कुत्र्याचा क्यूट डान्स, पाहा व्हिडीओ
- Viral Video : फ्रीजमधून केलेली चोरी पकडल्यावर थरथर कापू लागला कुत्रा, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha