IPL 2022: भुवनेश्वर कुमारनं मोडला आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम, इरफान पठाणच्या विक्रमाशी केली बरोबरी
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 50 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादनं दिल्ली कॅपिटल्सला 21 धावांनी पराभूत केलं.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 50 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादनं दिल्ली कॅपिटल्सला (SRH Vs DC) 21 धावांनी पराभूत केलं. हैदराबादच्या विजयात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यान त्यानं चार षटक टाकून 25 धावा दिल्या. ज्यात एका निर्धाव षटकाचा समावेश होता. या निर्धाव षटकासह भुवनेश्वर कुमारनं आयपीएलमधील खास विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटक टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्यानं समावेश केला असून भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणच्या (Irfan Pathan) विक्रमाशी बरोबरी केली आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटक टाकणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत भुवनेश्वर कुमार दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्यानं आयपीएलच्या कारकिर्दीत आतापर्यंत 10 निर्धाव षटक टाकले आहेत. तर, इरफान पठाणनंही त्याच्या आयपीएलच्या कारकिर्दीत 10 निर्धाव षटक टाकले आहेत. या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार अव्वल स्थानी आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 14 निर्धाव षटक टाकण्याची नोंद आहे. यानंतर लसिथ मलिंगा तिसऱ्या स्थानावर आहे. मलिंगानं एकूण 8 निर्धाव षटक टाकली आहेत. तर संदीप शर्मा आणि धवल कुलकर्णीही 8-8 निर्धाव षटकासह तिसऱ्या स्थानावर आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटक टाकणारे गोलंदाज-
गोलंदाजांचं नाव |
विकेट्स |
प्रवीण कुमार | 14 |
भुवनेश्वर कुमार | 10 |
इरफान पठाण | 10 |
लसिथ मलिंगा | 08 |
संदीप शर्मा | 08 |
धवल कुलकर्णी | 08 |
डेल स्टेन | 07 |
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात भुवनेश्वर कुमारनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. त्यानं 10 सामन्यात 10 विकेट्स घेतले आहेत. यादरम्यान एका सामन्यात 22 धावांत 3 विकेट्स घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. भुवनेश्वरनं आयपीएलच्या 142 सामन्यात 152 विकेट घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-