एक्स्प्लोर

Top 10 Key Points : दिल्लीचा हैदराबादवर विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

DC vs SRH: दिल्लीने या विजयासह आयपीएलमधील आपले आव्हान जिवंत ठेवलेय. दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. आज झालेल्या रोमांचक सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवूयात...

DC vs SRH, Top 10 Key Points : दिल्लीने हैदराबादचा 21 धावांनी पराभव केला. दिल्लीने दिलेल्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाला 186 धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादच्या निकोलस पूरनची विस्फोटक खेळी व्यर्थ गेली. पूरन 62 धावा काढून बाद झाला. हैदराबादचा हा सलग सहावा पराभव होता. दिल्लीने या विजयासह आयपीएलमधील आपले आव्हान जिवंत ठेवलेय. दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. आज झालेल्या रोमांचक सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवूयात...

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 50 व्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात मनदीप सिंहला बाद करत हैदराबादला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर सीन एबॉटने मिचेल मार्शचा अडथळा दूर केला... मनदीप शून्य तर मिचेल मार्श 10 धावा काढून बाद झाले. दिल्लीच्या दोन विकेट झटपट गेल्या. 

विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर याने हल्लाबोल केला. वॉर्नरने पंतसोबत हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. वॉर्नरने पंतसोबत 29 चेंडूत 48 धावांची भागिदारी केली. कर्णधार ऋषभ पंत 26 धावा काढून बाद झाला. या खेळीदरम्यान पंतने 3 षटकार चोपले. 

पंत बाद झाल्यानंतर वॉर्नर आणि रॉवमन पॉवेल यांनी विस्फोटक फंलदाजी केली. या दोघांनी हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 66 चेंडूत 122 धावा जोडल्या. वॉर्नरने नाबाद 92 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान वॉर्नरने तीन षटकार आणि 12 चौकारांचा पाऊस पाडला. रॉवमन पॉवेलने 35 चेंडूत 67 धावांची वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान पॉवेलने सहा षटकार आणि तीन चौकार लगावले. 

श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार आणि सीन एबॉट यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळीला. कार्तिक त्यागी, उमरान मलिक यांची पाटी कोरी राहिली. 

दिल्लीने दिलेल्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाला 186 धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादच्या निकोलस पूरनची विस्फोटक खेळी व्यर्थ गेली. पूरन 62 धावा काढून बाद झाला. 

हैदराबादचा हा सलग सहावा पराभव होता. दिल्लीने या विजयासह आयपीएलमधील आपले आव्हान जिवंत ठेवलेय. दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. 

207 धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. खलील अहमदने अभिषेक शर्माचा तर नॉर्त्जेने विल्यमसनचा अडथळा दूर केला. अभिषेक शर्मा सात तर विल्यमसन चार धावा काढून बाद झाला. राहुल त्रिपाठीला मिचेल मार्शने 22 धावांवर तंबूत धाडलं. राहुल त्रिपाठीनंतर आलेला शशांक सिंहलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. सीन एबॉटही आठ धावांत तंबूत परतला. 

एका बाजूला विकेट पडत असताना निकोलस पूरन याने फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. निकोलस पूरन सामना फिरवेल असं वाटत असतानाच शार्दुल ठाकूरने विकेट घेतली. शार्दूल ठाकूरने निकोलस पूरनला 62 धावांवर बाद केले. निकोलस पूरनने 34 चेंडूत 62 धावांची खेळी केली.  

डेविड वॉर्नर, रॉवमन पॉवेल यांची विस्फोटक खेळी, त्याला खलील अहमदचा भेदक माऱ्याची साथ... या बळावर दिल्लीने हैदराबादचा 21 धावांनी पराभव केला. दिल्लीकडून खलील अहमद याने भेदक मारा केला. खलील अहमदने चार षटकात 30 धावा खर्च करताना तीन विकेट घेतल्या. खलीलला शार्दुल ठाकूर आणि इतर गोलंदाजांनी चांगली साथ दिली. शार्दुल ठाकूरने दोन तर नॉर्त्जे, मिचेल माऱ्श आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
Embed widget