एक्स्प्लोर

IPL 2021 Final Match: माहिची जादू कायम! धोनीच्या नेतृत्वात CSK ने चौथ्यांदा आयपीएल जेतेपद पटकावलं

IPL 2021, KKR vs CSK: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने (CSK) चौथ्यांदा आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावलं आहे.

IPL (IPL 2021) च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला 193 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून कोलकाता संघ निर्धारित 20 मध्ये 9 विकेट गमावून फक्त 165 धावा करू शकला. चेन्नईच्या विजयाचा नायक फाफ डु प्लेसिस होता, ज्याने नाबाद 86 धावांची खेळी करत चेन्नईला मोठी धावसंख्या उभारुन दिली. डु प्लेसिस व्यतिरिक्त चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 32 धावांचे योगदान दिले. याशिवाय रॉबिन उथप्पाने 15 चेंडूत 31 धावांची तुफानी खेळी केली. याशिवाय शार्दुल ठाकूरने 3, जोश हेजलवूड, रवींद्र जडेजाने 2-2 विकेट, दीपक चहर आणि ड्वेन ब्रेबो यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडचा एक अनोखा विक्रम
चेन्नईचे सलामीवीर फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली कामगिरी करत चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी भागीदारीचा अनोखा विक्रम केला. या हंगामात दोन्ही फलंदाजांमध्ये सर्वाधिक 756 धावांची भागीदारी झाली. आयपीएलच्या इतिहासातील एका हंगामातील ही तिसरी सर्वोच्च भागीदारी आहे. आयपीएल 2016 मध्ये विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने 939 धावांची विक्रमी भागीदारी केली. यानंतर, डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी आयपीएल 2019 मध्ये 791 धावांची भागीदारी केली होती. 

धोनीचा 300 वा टी -20 सामना
तत्पूर्वी, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआर आणि सीएसके संघांनी या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. कर्णधार म्हणून धोनीचा हा 300 वा टी -20 सामना आहे. या पदावर पोहोचणारा तो जगातील पहिला कर्णधार बनला आहे. धोनीशिवाय, वेस्ट इंडिजचा डॅरेन सॅमी 200 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये कर्णधार होणारा एकमेव खेळाडू आहे. धोनीने 213 सामन्यांमध्ये यलो ब्रिगेडचे नेतृत्व केले असून 130 विजय आणि 81 पराभव स्वीकारले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने आयपीएल 2010, 2011 आणि 2018 जिंकले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनेतनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनेतनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
Kolhapur ZP election: कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड

व्हिडीओ

ZP BJP Result : 731 पैकी 319 कल-निकाल हाती, निकालांमध्ये भाजपची शंभरी
Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनेतनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनेतनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
Kolhapur ZP election: कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
ZP Election Result 2026: भाजप, राष्ट्रवादीपासून शिवसेना काँग्रेसपर्यंत...; कुणाला किती जागा?, जिल्हा परिषदेचा संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
भाजप, राष्ट्रवादीपासून शिवसेना काँग्रेसपर्यंत...; कुणाला किती जागा?, जिल्हा परिषदेचा संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
Chhatrapati Sambhajinagar: आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Chhatrapati Sambhajinagar ZP election result 2026: छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Solapur ZP election result 2026 मोठी बातमी! सोलापुरात मोहिते पाटलांना धक्का, उत्तम जानकरांचेही स्वप्न भंगले; भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी
मोठी बातमी! सोलापुरात मोहिते पाटलांना धक्का, उत्तम जानकरांचेही स्वप्न भंगले; भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी
Embed widget