CSK vs DC : दिल्लीची चेन्नईवर मात, पराभवामुळे धोनी निराश; म्हणाला...
IPL 2021, CSK vs DC : आयपीएलच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीनं आपलं खातं विजयानं उघडलं आहे. चेन्नईचा 7 विकेट्सनी पराभव करत दिल्लीनं विजय मिळवला आहे. पृथ्वी शॉ आणि शिखर यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर दिल्लीने हे लक्ष्य 18.4 षटकांत पूर्ण केलं.
IPL 2021, CSK vs DC : आयपीएल 2021च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा सात विकेट्सनी पराभव केला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावत 188 धावांचं लक्ष्य दिल्लीसमोर ठेवलं होतं. चेन्नईचं आव्हान स्विकारत मैदानात उतरलेल्या दिल्लीने 18.4 ओव्हर्समध्ये तीन विकेट गमावत हे आव्हान पूर्ण केलं. या पराभवामुळे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी निराश झाला आहे. सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, आयपीएल 2021 च्या पहिल्या सामन्यातील खराब कामगिरीनंतर त्याच्या संघातील गोलंदाजांनी धडा घेऊन आपल्या चुका सुधारणं गरजेचं आहे.
सामन्यातील पराभवानंतर धोनी म्हणाला की, आम्ही उत्तम गोलंदाजी करु शकलो असतो. परंतु गोलंदाज फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. त्यांना धडा मिळाला आहे आणि पुढे ते पूर्णपणे प्रयत्न करुन चांगली कामगिरी करतील.
धोनीचं म्हणणं आहे की, कालच्या सामन्यात दव पडल्यामुळे सामन्याची रुपरेषा बदलली. खरंतर दवाकडे लक्ष देऊन आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचं लक्ष्य समोर ठेवलं होतं.
धवन आणि शॉने सांभाळली दिल्लीची धुरा
पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर दिल्लीने हे लक्ष्य 18.4 षटकांत पूर्ण केलं. शिखर धवन आणि पृथ्वी शॉने 54 चेंडूंमध्ये 85 धावा केल्या. या डावात त्यांनी 10 चौकार आणि दोन षटकार लगावले. शॉने 38 चेडूंमध्ये 72 धावांची धमाकेदार खेळी केली. या दरम्यान पृथ्वीने 9 चौकार आणि तीन षटकार लगावले. शिखर धवन आणि पृथ्वी शॉने पहिल्या विकेटसाठी 13.3 ओव्हर्समध्ये 138 धावा करत आपल्या संघाचा विजय निश्चित केला होता. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने 12 चेंडूंमध्ये दोन चौकरांच्या मदतीने 15 धावा करुन नाबाद खेळी केली. तर दिल्लीच्या गोलंदाजांनीही संघाला विजय मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला. दिल्लीकडून ख्रिस वोक्स आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 2 तर, अश्विन आणि टॉम करन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :