IPL 2021 | कुटुंबापासून दूर असूनही नाही येणार त्यांची आठवण; पाहा अशी आहे Mumbai Indians ची टीम रुम
IPL 2021 आयपीएलचा प्रत्येक हंगाम हा क्रीडारसिकांसाठी एक परवणी असतो. फक्त क्रीडारसिकच नव्हे, तर प्रत्येक संघ आणि त्यात सहभागी असणाऱ्या खेळाडूपासून सपोर्ट स्टाफपर्यंत सर्वांच्याच मनात आयपीएलबद्दल एक वेगळंच प्रेम आणि आपुलकी पाहायला मिळते.
IPL 2021 आयपीएलचा प्रत्येक हंगाम हा क्रीडारसिकांसाठी एक परवणी असतो. फक्त क्रीडारसिकच नव्हे, तर प्रत्येक संघ आणि त्यात सहभागी असणाऱ्या खेळाडूपासून सपोर्ट स्टाफपर्यंत सर्वांच्याच मनात आयपीएलबद्दल एक वेगळंच प्रेम आणि आपुलकी पाहायला मिळते. अशा या स्पर्धेसाठी साधारण दोन महिन्यांपर्यंत खेळाडू हे आपल्या संपूर्ण कुटुंबापासून, घरापासून दूर असतात.
अनेकांना कुटुंबातील काही व्यक्तींना सोबत आणण्याची परवानगी मिळतेही. पण, ज्यांना परवानगी मिळत नाही, त्यांच्यासाठी मात्र संघ व्यवस्थापनानं काही खास व्यवस्था केली आहे. ज्यामुळं खेळाडूंना कुटुंबापासून दूर असतानाही त्यांची कमतरता जाणवणार नाही.
नुकतंच मुंबई इंडियन्स या संघानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संघातील खेळाडू सूर्यकुमार यादव हा संघाची खास खोली सर्वांना दाखवताना दिसत आहे.
IPL 2021 | कोळी गाण्यावर मुंबई इंडियन्सचे खेळाडू ठेका धरतात तेव्हा...
प्रत्येक घरात एक असा खास कोपरा किंवा एक अशी खास जागा असते, जी सर्वांच्याच आवडीची असते. मुंबई इंडियन्सच्या संघातील प्रत्येकासाठीच ही अशी जागा म्हणजे टीम रुम. इथं प्रत्येकाच्या आवडीच्या खेळांपासून ते अगदी त्यांच्या कुटुंबीयांसोबतच्या काही खास क्षणांची झलक पाहायला मिळते. टेलिव्हिजन म्हणू नका किंवा मग मल्टी प्लेअर गेम्स. प्रत्येत गोष्टीची व्यवस्था इथं करण्यात आली आहे. याचबाबत माहिती देत असताना सूर्यकुमार यादव प्रत्येक ठिकाणी कोणत्या खेळाडूचा किंवा संघातील कोणत्या व्यक्तीचा सर्वाधिक वावर असतो, याबाबतची माहिती देताना दिसत आहे.
'ओ जी शादी के बाद सबकी लाईफ है रिस्की...', पाहा युझवेंद्र- धनश्रीच्या लग्नाचा धम्माल व्हिडीओ
संघाची ही खास रुम दाखवत असताना सूर्यकुमारचा उत्साह पाहण्याजोगा आहे. या संपूर्ण रुममध्ये, खरंतर रुमच्या बाहेर एक भलीमोठी एमआय फॅमिली वॉलही आहे. मुंबई इंडियन्स या संघाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाच्या हक्काची ही जागा आपली सर्वात आवडीची जागा असल्याचं सूर्यकुमार न चुकता सांगतो. अशी आहे मुंबईच्या संघाची ही खास खोली. या संपूर्ण सफरीमध्ये तुम्हाला काय भावलं?