IPL 2020 : राजस्थान रॉयल्सची विजयी घोडदौड कोलकाताचे नाईट रायडर्स रोखणार का?
IPL 2020 : मागील दोन सामन्यात विजय मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाची विजयी घोडदौड रोखण्याचे आव्हान आज कोलकाताच्या नाईट रायडर्ससमोर असणार आहे.
IPL 2020 KKR vs RR : आयपीएल 2020 स्पर्धेत आज कोलकाता नाइट रायडर्सचा सामना फुल फॉर्मात असलेल्या राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. पहिल्या दोन्ही विजयात राजस्थानने द्विशतकी धावसंख्येचा डोंगर उभा केला आहे. राजस्थानची ही घोडदौड रोखण्यासाठी कोलकाताला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. राजस्थान आज विजय मिळवून विजयाची हॅटट्रिकच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे कोलकाता दुसऱ्या विजयासाठी इच्छुक आहे.
स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग दोन विजय मिळवले आहेत. या दोन्ही सामन्यात राजस्थानने 200 पेक्षा अधिक धावा उभारल्या होत्या. यामुळे राजस्थानच्या फलंदाजांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला आहे. फलंदाजीत कर्णधार स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन, हरियाणाचा अष्टपैलू राहुल तेवतिया फुल्ल फॉर्मात आहे. तर गोलंदाजीत जोफ्रा ऑर्चर, टॉम करन, श्रेयश गोपाल चांगली कामगिरी करत आहेत.
IPL 2020 : पॉइंट टेबलमध्ये धोनीच्या संघाला मोठा झटका; ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाकडे?
दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सची प्रमुख मदार आंद्रे रसेल आणि इयॉन मॉर्गन यांच्यावर आहे. अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणाऱ्या या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत मर्यादित संधी मिळाली आहे. याशिवाय मागील सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या शुबमन गिलला सातत्याने धावा कराव्या लागणार आहेत. कर्णधार दिनेश कार्तिकचा फॉर्म केकेआरसाठी डोकेदुखी ठरत आहे. केकेआरच्या गोलंदाजीची भिस्त पॅट कमिन्स, कुलदीप यादव, सुनिल नरेन, शिवम मावी यांच्यावर आहे.
कोलकाता नाइट राइडर्सची संभावित प्लेईंग इलेव्हन :
दिनेश कार्तिक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नारायण, पॅट कमिंन्स, इयॉन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, टॉम बँटन, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, निखिल नाइक आणि अली खान.
राजस्थान रॉयल्सची संभावित प्लेईंग इलेव्हन स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, यशस्वी जैस्वाल, मनन वोहरा, कार्तिक त्यागी, आकाश सिंह, ओशन थॉमस, अँड्रयू टाय, डेव्हिड मिलर, टॉम करन, अनिरुद्ध जोशी, श्रेयस गोपाल, रियान पराग, वरुण आरोन, शशांक सिंह, अनुज रावत, महिपाल लोमरोर आणि मयांक मारकंडे.
EXCLUSIVE Sherlyn Chopra | क्रिकेटपटूंच्या पत्नीही ड्रग्जचं सेवन करतात; शर्लिन चोप्राचे गंभीर आरोप