एक्स्प्लोर

Rahul Tewatia | 23 चेंडूत 17 धावा ते 31 चेंडूत 53 धावा, एका षटकात पाच सिक्सर; कोण आहे राहुल तेवतिया?

आयपीएलच्या एका षटकात पाच षटकार ठोकून राहुल तेवतिया शारजहापासून जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वात चर्चित क्रिकेटपटू बनला आहे. खरंतर राहुल तेवतिया हा नवा खेळाडू नाही. तो 2014 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे, पण त्याची अशी धडाकेबाज खेळी यापूर्वी कधीच दिसली नव्हती.

मुंबई : आयपीएलच्या एका षटकात पाच षटकार ठोकून राहुल तेवतियाने संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे आकर्षित केलं आहे. खरंतर राहुल तेवतिया हा नवा खेळाडू नाही. तो 2014 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे, पण त्याची अशी धडाकेबाज खेळी यापूर्वी कधीच दिसली नाही. याआधी फक्त 2018 मध्येच त्याने 50 धावा केल्या होत्या, तेही मोसमातील आठ सामन्यातील मिळून. यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती 24. परंतु पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर तो शारजहापासून जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वात चर्चित क्रिकेटपटू बनला.

प्रत्येक जण राहुल तेवतियाचं कौतुक करत आहे. पण या ठिकाणी पोहोचण्यासाठी राहुल तेवतियाने फार संघर्ष केला आहे. म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर, असंच काहीचं राहुल तेवतियाच्या बाबतीत घडलं आहे. जाणून घेऊया कोण आहे राहुल तेवतिया? आणि तो आयपीएलचा स्टार खेळाडू कसा बनला?

राहुल तेवतियाचा जन्म राहुल तेवतियाचा जन्म 20 मे 1993 रोजी हरियाणाच्या फरीदाबादमध्ये झाला. राहुल तेवतियाचे वडील कृष्णपाल तेवातिया हे व्यवसायाने वकील आहेत.

राहुल तेवतियाची क्रिकेट कारकीर्द राहुल तेवतियाला बालपणापासूनच क्रिकेट खेळण्याचा छंद होता. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. क्रिकेटप्रती त्याचा ओढा पाहता त्याच्या वडिलांनी त्याला वल्लभगडमध्ये असलेल्या क्रिकेट अकादमीत दाखल केलं. क्रिकेट अकादमीमध्ये दाखल झाल्यानंतर राहुल तेवतियाने क्रिकेटचे बारकावे शिकले. यानंतर तो भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विजय यादव यांच्या अकादमीत दाखल झाला. इथे आल्यानंतर राहुल तेवतियाच्या क्रिकेटमध्ये सुधारणा झाली आणि लवकरच त्याची हरियाणाच्या रणजी संघात फिरकीपटू म्हणून निवड झाली. रणजी सामन्यांमध्ये राहुल तेवतियाने उत्तम कामगिरी केली. त्याने 6 डिसेंबर 2013 रोजी हरियाणाकडून खेळताना कर्नाटकविरुद्ध प्रथम श्रेणीत आणि 25 फेब्रुवारी 2017 रोजी ओदिशाविरुद्ध दिल्लीमध्ये लिस्ट A मध्ये पदार्पण केलं.

राहुल तेवतियाचं आयपीएल करिअर राहुल तेवतियाने 2014 मध्ये राजस्थान रॉयल्स संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने आयपीएल करिअरचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला होता. यानंतर 2017 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने राहुल तेवतियाला विकत घेतलं. मात्र किंग्ज इलेवन पंजाब संघात असताना राहुल तेवतियाला जास्त संधी मिळाली नाही. याचदरम्यान सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील आठ सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेत राहुल तेवतियाने क्रिकेट विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवला. याच कारणामुळे 2018 मध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाने राहुल तेवतिया तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. यानंतर राहुल तेवतिया यंदाच्या आयपीएल 2020 मध्ये पुन्हा राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे.

23 चेंडूत 17 धावा ते 31 चेंडूत 53 धावा राजस्थान रॉयल्सविरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यात पंजाबने राजस्थानसमोर विजयासाठी 224 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सुरुवातीला राहुल तेवतिया एक-एक धावेसाठी झगडत होता. त्याने रवि विश्नोईच्या चेंडूवर एक षटकार लगावला खरा पण पुढचे अनेक चेंडू वाया घालवले होते. त्याला 23 चेंडूत फक्त 17 धावाच करता आल्या. तोपर्यंत कर्णधार स्टीव स्मिथ आणि संजू सॅमसन माघारी परतले होते. राजस्थानच्या हातातून सामना निसटत होता. अखेरच्या तीन षटकात 51 धावा करायच्या होत्या.

अठराव्या षटकात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने शेल्डन कॉट्रलकडे चेंडू सोपवला. मग तेवतियाने जे केलं ते कॉट्रल आजन्म विसणार नाही. तोच काय तर पंजाबचा संघ आणि हा सामना पाहणारे क्रिकेटचाहते देखील विसरणार नाहीत.

कॉट्रलच्या पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या शॉर्ट बॉल होता, त्यावरही षटकार. तिसऱ्या चेंडूवरही सिक्सर. आता पंजाबच्या टीममध्य अस्वस्थता पसरली होती. चौथा चेंड फुलटॉस होता, त्यावरही तेवतियाने सिक्सर ठोकला. राजस्थानच्या डग आऊटमध्ये खेळाडूंच्या चेहऱ्यावर चमक आली तर पंजाबचे खेळाडूंमधील अस्वस्थता कायम होती. षटकातील पाचवा चेंडू असा होता की तेवतियाला समजला नाही. पण सहा चेंडू मिडविकेट बाऊंड्रीबाहेर गेला आहे. अशाप्रकारे पाच चेंडूतच सामन्याची स्क्रिप्ट बदलली आणि तेवतिया हिरो बनला.

पुढच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तेवतिया षटकार ठोकून आयपीएलमधील आपलं पहिलंवहिलं अर्धशतक पूर्ण केलं. पुढच्याच चेंडूवर तो आऊट झाला, पण 31 चेंडूत 53 धावा करुन त्याने राजस्थानचा विजय निश्चित केला.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget