RR vs RCB, Pitch Report : बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RR vs RCB) या सामन्यात काही विशेष खेळाडूंकडून उत्तम खेळाची अपेक्षा साऱ्यांनाच आहे.
![RR vs RCB, Pitch Report : बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? In RR vs RCB IPL match which 11 players will play best game and hows pitch report know details RR vs RCB, Pitch Report : बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/6f822f539ed29f729ffa64a54bc76d0e_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
RR vs RCB Picth Report : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RR vs RCB) यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आजचा हा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात खेळवला जाणार आहे. आयपीएलमध्ये आजवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्या एकमेंकाविरुद्धच्या सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी आजवर 24 सामने एकमेंकाविरुद्ध खेळले आहेत. 24 मधील 12 सामने आरसीबीने जिंकले असून 10 सामने राजस्थानने जिंकले आहेत. दरम्यान आजच्या सामन्यात नेमकी कोणत्या खेळाडूंवर भिस्त असणार आणि मैदानाची स्थिती कशी असेल हे पाहूया...
राजस्थान विरुद्ध बंगळुरु, पिच रिपोर्ट
आज सामना होणाऱ्या प्रसिद्ध अशा वानखेडे मैदानाची खेळपट्टी पाहता एक मोठी धावसंख्या नक्कीच उभा राहू शकते. कारण वानखेडेची खेळपट्टी कायमच फलंदाजांसाठी लाभदायक ठरली असून छोट्या बाऊंड्रीस फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरतात. आजच्या सामन्यातही दव हा एक मोठा फॅक्टर ठरु शकतो. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच प्रथम गोलंदाजी घेऊ इच्छित असणार आहे.
राजस्थान विरुद्ध बंगळुरु अशी असेल ड्रीम 11 (RR vs RCB Best Dream 11)
विकेटकीपर- संजू सॅमसन, जोस बटलर
फलंदाज- यशस्वी जैस्वाल, फाफ डु प्लेसीस, विराट कोहली, शिमरॉन हिटमायर
ऑलराउंडर- वानिंदू हसरंगा,
गोलंदाज- आकाश दीप, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, रवीचंद्रन आश्विन
हे देखील वाचा-
- IPL 2022, RR vs RCB : आज रंगणार बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामना, कधी, कुठे पाहाल सामना?
- RR vs RCB : राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामन्यात होऊ शकतात मोठे बदल, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
- Womens World Cup 2022 : आयसीसीने निवडली महिला विश्वचषकातील बेस्ट 11, एकाही भारतीय खेळाडूला संधी नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)