एक्स्प्लोर

RCB vs PBKS, Head to Head : बंगळुरु विरुद्ध पंजाबमध्ये रंगणार आजची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी

IPL 2022 : आज पार पडणाऱ्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स सामन्यापूर्वी दोघांच्या एकमेंकाविरुद्धच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर एक नजर...

RCB vs PBKS : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) 60 व्या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स (RCB vs PBKS) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. आजचा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार आहे. प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी दोन्ही संघाना आजचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांना एक अटीतटीची लढत आज पाहायला मिळू शकते. सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.

बंगळुरु विरुद्ध पंजाब Head to Head

आयपीएलमध्ये आजवर रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स तब्बल 29 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता पंजाबचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 16 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बंगळुरुने 13 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. यंदाच्या गुणतालिकेचा विचार करता बंगळुरुने आतापर्यंत 12 पैकी 7 सामने जिंकत 14 गुणांसह चौथं स्थान मिळवलं आहे. दुसरीकडे पंजाब संघाने 11 पैकी 5 सामने जिंकल्याने ते गुणतालिकेत आठव्या स्थानी आहेत.

आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11  

बंगळुरु - रजत पाटीदार, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), माहिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, मोहम्मद सिराज

पंजाब - जॉनी बेअरस्टो, मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), भानुका राजपक्षा, रिषी धवन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, संदीप शर्मा, राहुल चाहर

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget