KKR vs SRH, Head to Head : कोलकात्यासमोर आज हैदराबाद मैदानात, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी
IPL 2022 : आज पार पडणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यापूर्वी दोघांच्या एकमेंकाविरुद्धच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर एक नजर...
![KKR vs SRH, Head to Head : कोलकात्यासमोर आज हैदराबाद मैदानात, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी In IPL 2022 kolkata knight riders vs sunrisers hyderabad know head to head statistics KKR vs SRH, Head to Head : कोलकात्यासमोर आज हैदराबाद मैदानात, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/2018e664eb896c33baf2f9b8f46311d0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
KKR vs SRH : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) आज पार पडणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद (KKR vs SRH) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. आजचा हा सामना पुण्याच्या एमसीए मैदानात पार पडणार असून दोन्ही संघामधील अंतिम 11 बदलण्याची दाट शक्यता आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता संघाने 12 पैकी 7 सामने गमावले असून 5 सामने जिंकले आहे. त्यामुळे त्याचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. तर हैदराबादने देखील 11 पैकी 5 सामने जिंकत सहावं स्थान मिळवलं असून त्यांच्याकडे केकेआरपेक्षा अधिक सामने हातात असल्याने त्यांचं पुढील फेरीत पोहोचण्याचं गणित अधिक सोपं आहे. दोघांचा फॉर्म समसमान असल्याने आजचा सामना चुरशीचा होऊ शकतो. तर आजच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या आजवरच्या इतिहासावर एक नजर फिरवूया...
कोलकाता विरुद्ध हैदराबाद Head to Head
आयपीएलमध्ये आजवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद (KKR vs SRH) हे संघ 22 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता कोलकात्याचं पारडं जड राहिलं आहे. त्यांनी 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर हैदराबादने 8 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे.
आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
कोलकाता - अॅरॉन फिंच, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, नितीश राणा, बाबा इंद्रजीत (विकेटकिपर), आंद्रे रसेल, सुनिल नारायण, उमेश यादव, हर्षीत राणा, टीम साऊथी
हैदराबाद - केन विलियमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मारक्रम, निकोलस पूरन, शशांक सिंह, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, मार्को जानसेन, उमरान मलिक
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)