(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CSK vs GT, Pitch Report : आज गुजरातसमोर चेन्नईचे आव्हान; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
CSK vs DC : आज आयपीएलमध्ये दोन सामने पार पडणार असल्याने क्रिकेट प्रेमींना दोन चुरशीच्या लढती पाहायला मिळू शकतात. यातील पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होईल.
CSK vs GT, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आजच्या दिवसातील पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) या दोन्ही संघात पार पडणार आहे. दरम्यान आधीच प्लेऑफममध्ये स्थान मिळवणाऱ्या गुजरात संघसाठी आजचा सामना एका सराव सामन्याप्रमाणे असेल. तर चेन्नई सुपरकिंग्स संघाचं पुढील फेरीचं आव्हान आधीच संपुष्टात आल्याने त्यांच्यासाठी आजचा विजय मिळवल्यास केवळ मनाला समाधान देणाराच असेल.
गुजरातकडून गिल, साहा आणि हार्दिक पांड्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. तर तेवातिया आणि मिलर जबरदस्त फिनिशिंग देत आहेत. त्याशिवाय गोलंदाजीत मुहम्मद शमी, लाकी फर्ग्यूसन आणि राशिद खान जलवा दाखवत आहेत. चेन्नईकडून फलंदाजीची सर्व मदार ऋतुराज गायकवाड आणि कॉन्वे यांच्यावर आहे. या दोघांव्यतिरिक्त धोनीनेही काही सामन्यात जलवा दाखवला आहे. इतर फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. गोलंदाजीत मुकेश चौधरी आणि तिक्षणा यांचा अपवाद वगळता गोलंदाज प्रभावी मारा करण्यात अपयशी ठरत आहेत. दरम्यान आतापर्यंतच्या सामन्यांत खेळाडूंच्या फॉर्मचा विचार करता कोणत्या 11 (Probable 11) खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...
चेन्नई विरुद्ध गुजरात अशी असेल ड्रीम 11 (CSK vs GT Best Dream 11)
विकेटकीपर- रिद्धिमान साहा
फलंदाज- शुभमन गिल, डेव्हिड मिलर, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे,
ऑलराउंडर- मोईन अली, हार्दिक पांड्या, राहुल तेवतिया
गोलंदाज- राशिद खान, मुकेश चौधरी, ड्वेन ब्राव्हो
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात पार पडणार आहे. इतर मैदानांच्या तुलनेत काहीशी छोटी सीमारेषा असणाऱ्या या मैदानात एक मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. त्यात सामना दुपारच्या सुमारास असल्याने दोन्ही डावात दवाची अडचण येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. ज्यामुळे आज नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फंलंदाजी घेण्याची शक्यता अधिक आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Lakshya Sen Wins : थॉमस कपमध्ये भारत इतिहास रचण्याच्या तयारीत, बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनकडून इंडोनेशियन खेळाडूचा पराभव
- Andrew Symonds Death : ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू
- Top 10 Key Points : कोलकात्याचा हैदराबादवर मोठा विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर