(Source: ECI/ABP News/ABP Majha)
6 षटकार ठोकणाऱ्या युवराजचा आयसीसीकडून सर्वात मोठा सन्मान
ICC Men T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी आयसीसीनं युवराज सिंह याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
ICC Men T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी आयसीसीनं युवराज सिंह याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विश्वविजेत्या युवराजला आयसीसीनं यंदाच्या टी20 वर्ल्डकपचा ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. 2007 च्या टी 20 विश्वचषकात युवराज सिंह यानं शानदार कामगिरी केली होती. युवराजनं इंग्लंडविरोधात एकाच षटकात सहा षटकार मारण्याचा भीमपराक्रम केला होता. 2007 टी 20 विश्वचषकावर भारताने नाव कोरलं होतं. य़ामध्ये युवराजचा सिंहाचा वाटा होता. फलंदाजी आणि गोलंदाजीत युवराजनं अमुलाग्र योगदान दिलं होतं. युवराज सिंह याचा आयसीसीनं आता सर्वात मोठा सन्मान केलाय. त्याला टी20 विश्वचषकाचा ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त केलेय. याआधी धावपटू उसेन बोल्ट यालाही ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलं.
आयपीएलच्या रनधुमाळीनंतर टी 20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. 1 जून ते 29 जून यादरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी 20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेय. याच टी 20 विश्वचषकासाठी युवराज सिंह ब्रँड अँबेसिडर असणार आहे. आयसीसीनं आपल्या एक्स (ट्वीटरवर) खात्यावर याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.
Who will make it to India’s squad for the ICC Men’s #T20WorldCup 2024? 🤔
— ICC (@ICC) April 26, 2024
Event Ambassador Yuvraj Singh has some exciting prospects on his list 👀https://t.co/zMjeIig7qF
2007 टी20 विश्वचषक चॅम्पियन युवराज सिंह आयसीसीसोबत बोलताना म्हणाला की, क्रिकेटमधील माझी सर्वोच्च आठवणी टी 20 विश्वचषकपसंदर्भातील आहे. त्यामध्ये एका षटकात सहा षटकाराचाही समावेश आहे. त्यामुळेच टी20 विश्वचषकाचा भाग होणं, माझ्यासाठी रोमांचक आहे. यंदाच्या विश्वचषकाचं सर्वात मोठं आयोजन करण्यात येईल, असा मला विश्वसा वाटतोय. वेस्ट इंडिज क्रिकेट खेळण्यासाठी शानदार जागा आहे. तर अमेरिकामध्ये क्रिकेटचा विस्तार होत आहे. त्याचा भाग असल्याचा मला अभिमान आहे.
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले 20 संघ...
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा
कोणत्या गटामध्ये कोणते संघ
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
भारतीय संघाचे विश्वचषकाचं वेळापत्रक
5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा