एक्स्प्लोर

IPL 2024 Final:आयपीएलमध्ये विकेटचा पाऊस पाडला, केकेआरच्या बॉलरचं नशीब उजळणार, टीम इंडियात लवकरच वर्णी लागणार? 

Harshit Rana KKR: हर्षित राणाने कोलकाता नाइट रायडर्ससाठी आयपीएलमध्ये दमदार गोलंदाजी केली. केकेआरसाठी हर्षित राणानं दमदार कामगिरी केली होती.

Harshit Rana KKR IPL 2024 नवी दिल्ली : कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादला (Sun Risers Hyderabad) पराभूत करत विजेतेपद मिळवलं. कोलकाता नाईट रायडर्सच्या अंतिम फेरीतील विजयामध्ये गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम कामगिरी हर्षित राणानं (Harshit Rana) केली. हर्षित राणानं केकेआरकडून 19 विकेट घेतल्या. हर्षित राणानं आयपीएल 2024 मध्ये 12 मॅचमध्ये 19 विकेट घेतल्या. हर्षित राणाला केकेआरकडून केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.हर्षित राणासाठी टीम इंडियाची दारं लवकरच उघडू शकतात.  

हर्षित राणा यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर होता. हर्षितनं 19 विकेट घेतल्या. तर, सर्वाधिक विकेटसाठी मिळणारी पर्पल कॅप पंजाब किंग्जच्या हर्षल पटेलला मिळाली. हर्षल पटेलनं 14 मॅचमध्ये 24 विकेट मिळाल्या होत्या.  वरुण चक्रवर्ती दुसऱ्या क्रमांकावर राहिला, त्यानं 21 विकेट घेतल्या.  जसप्रीत बुमराह 13 मॅचमध्ये 20 विकेट घेतल्या. 

हर्षित राणासाठी टीम इंडियाची दारं उघडणार?

हर्षित राणानं आयपीएलमध्ये 2022 मध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी त्याला केवळ 2 मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली. हर्षित राणानं 2023 च्या आयपीएलमध्ये 6 मॅचमध्ये 5 विकेट घेतल्या. मात्र, 2024 चं आयपीएल हर्षित राणासाठी लकी ठरलं. हर्षित राणानं 13 मॅचमध्ये 19 विकेट घेतल्या. हर्षित राणानं लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध 24 धावा देत 3 विकेट घेतल्या.  मुंबई इंडियन्स आणि सनरायर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध त्यानं 2-2 विकेट घेतल्या. हर्षत राणानं फायनलमध्ये हैदराबाद विरुद्ध 24 धावा दिल्या होत्या.  

हर्षित राणाचं देशांतर्गत क्रिकेटमधील करिअर पाहता ते चांगलं राहिलं आहे. केकेआरनं 7 फर्स्ट क्लास मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 28 विकेट घेतल्या आहेत. हर्षित राणानं एका मॅचमध्ये 108 धावा देत 10 विकेट घेतल्या. त्यांनी लिस्ट एच्या 14 मॅचमध्ये 22 विकेट घेतल्या. हर्षित राणानं 25 टी 20 मॅचेसमध्ये 28 विकेट घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं 9 डावांमध्ये 343 धावा केल्या आहेत. आता त्याला लवकरच टीम इंडियामध्ये संधी मिळू शकते.  

दरम्यान, केकेआरनं अंतिम फेरीच्या लढतीत सनरायजर्स हैदराबादला 8 विकेटनं पराभूत केलं होतं. केकेआरनं सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवलं होतं. केकेआरनं यापूर्वी 2012 आणि 2014 ला विजेतेपद मिळवलं होतं.  

संबंधित बातम्या : 

Sourav Ganguly : टीम इंडियाचा कोच समजूतदारपणे निवडा, सौरव गांगुलीचा बीसीसीआयला परखड सल्ला, म्हणाला...

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Aravali hills: हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
Embed widget