एक्स्प्लोर

Sourav Ganguly : टीम इंडियाचा कोच समजूतदारपणे निवडा, सौरव गांगुलीचा बीसीसीआयला परखड सल्ला, म्हणाला...

Sourav Ganguly : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीनं बीसीसीआयला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

कोलकाता : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) टी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार आहे. बीसीसीआयनं (BCCI) नव्या प्रशिक्षकाच्या निवडीसाठी अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयकडे 27 मे पर्यंत अर्ज सादर करण्याची अखेरची मुदत होती. प्रशिक्षकपदासाठी जवळपास तीन हजार अर्ज आल्याचं समोर आलं होतं. भारताच्या प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरच्या नावाच्या चर्चा आघाडीवर असताना सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) बीसीसीआयला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. प्रशिक्षकाची भूमिका कोणत्याही खेळाडूच्या भविष्याला आकार देणारी असते, त्यामुळं प्रशिक्षकपदाची निवड समजूतदारपणे करणं आवश्यक आहे, असं सौरव गांगुली म्हणाला. 

सौरव गांगुलीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. सौरव गांगुलीनं कुणाच्याही जीवनात प्रशिक्षकाचं महत्त्व, त्याचं मार्गदर्शन आणि निरंतर प्रशिक्षण कुणाच्याही जीवनाला आकार देणारं असतं, मग ते तो मैदानावर असेल किंवा मैदानाबाहेर, असं म्हटलं. यामुळं कोच आणि संस्थेची निवड समजूतदारपणे करावी, असं गांगुलीनं म्हटलं. 

गौतम गंभीरचं नाव आघाडीवर?

बीसीसीआयकडे प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर गौतम गंभीरच्या नावाची चर्चा सुरु होती. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएलचं विजेतेपद मिळवलं आहे. गौतम गंभीरच्या नाव भारताच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलं तरी तो कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर म्हणून काम करत आहे. गंभीरला भारताचा कोच व्हायचं असल्यास केकेआरसोबत काम करणं थांबवाव लागू शकतं. 

गौतम गंभीर 2022 आणि 2023 ला लखनौ सुपर जाएंटसचा मेंटॉर म्हणून काम करत होता.  या दोन्ही आयपीएलमध्ये लखनौनं प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.

2024 ला गौतम गंभीर पुन्हा एकदा केकेआरचा मेंटॉर बनला. गौतम गंभीरनं केकेआरला विजेतेपद मिळवून देण्याच महत्त्वाची भूमिका बजावली. 

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच होण्यामध्ये प्रमुख दावेदार आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळ असलेल्या आयपीएल फ्रँचायजीच्या मालकानं गंभीरची डील पक्की झाल्याची माहिती आहे. दोन्ही बाजूंमध्ये अजून काही गोष्टींबाबत चर्चा सुरु आहेत. त्यामुळं अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. गौतम गंभीर 2007 च्या टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 च्या वर्ल्ड कपम विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. 

संबंधित बातम्या : 

IND vs PAK ISIS Threat: मोठी बातमी, भारत-पाकिस्तान मॅचमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका, इसिसकडून धमकी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget